Keshavraj Temple Asud, Dapoli | केशवराज मंदिर, दापोली
Travel IJ
0:00 / 0:00
Keshavraj Temple Asud, Dapoli | केशवराज मंदिर, दापोली
1 493 просмотра · 7 л. назад
Travel IJ
11,7 тыс. подписчиков
1 493 просмотра · 7 л. назад
Keshavraj Temple Asud, Dapoli | केशवराज मंदिर, दापोली
#keshavrajtemple #keshavrajtempledapoli #keshavrajmandirdapoli
उन्हाळ्यामध्ये कोकणात जाण्याचा योग आला, कोकणात दापोली या ठिकाणी आम्ही गेलो होतो. दापोली गावानजीक आसूड नावाचे गाव आहे. दापोली मध्ये चौकशी केल्यावर आम्हाला केशवराज मंदिराचा पत्ता मिळाला, कारण याआधी कोकणात गेलो नसल्यामुळे जास्त काही माहिती नव्हते. पण मंदिर छान बागेमध्ये वसलेले आहे कळल्यावर मंदिर पाहण्याचा मोह आवरला नाही आणि आम्ही गाडी मंदिराच्या दिशेने वळवली.
दापोली पासून साधारण ६-७ किलोमीटर वर हे मंदिर आहे. मंदिराजवळ जाण्यासाठी छोट्या पायवाटेने जावे लागते म्हणून आम्ही गाडी आसूड बागेच्या बाहेर लावली व मंदिराच्या दिशेने निघालो लागलो. बागेतून जात असताना आम्ही जून महिन्याच्या कडक उन्हामध्ये ही बागेत असलेल्या दाट झाडांच्या गर्द सावलीतून जाण्याचा आनंद घेत होतो. त्या ठिकाणी असलेली पोफळीची, नारळाची, आंब्याची, फणसाची अश्या प्रकारच्या उंच-उंच झाडे आम्हाला आपण कोकणात आहोत या गोष्टीची जाणीव करून देत होती. त्या बागेमध्ये असलेली शांतता, आणि कानावर पडणारे पक्ष्याचे वेगवेगळे आवाज आमचे मन प्रसन्न करत होते. १०-१५ मिनिटांच्या छोट्या प्रवासाने आम्ही मंदिराजवळ पोहचलो. मंदिराकडे पाहून ते मंदिर फार प्राचीन असावे याचा अनुभव आला. मंदिरामध्ये प्रवेश केल्यावर सावळ्या वर्णाची विष्णूंची मूर्ती पाहून मनाला प्रसन्न वाटले. मंदिराच्या एका बाजूला गोमुखातून पडणारे पाणी त्या ठिकाणच्या शांततेत लक्ष्य वेधून घेत होते ते पडणारे पाणी वर्षोनोवर्षे अश्या प्रकारे पडत असते मग उन्हाळा असला तरी. टेकडी वरून येणारे ते पाणी दगडी पन्हाळीमार्फत गोमुखापर्यंत आणलेले आहे. वर नैसर्गिक झऱ्यातून येणारे ते पाणी थंड आणि मधुर आहे. पुन्हा एकदा मंदिराचे दर्शन घेऊन आणि तेथील निसर्गाचे सौन्दर्य डोळ्यात साठवून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. तुम्हीही एकदा नक्कीच भेट द्या या मंदिराला कारण तेथील निसर्ग आणि शांततेच्या परिसरात, प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाही.
GEAR I USE TO MAKE MY VIDEOS
Canon DSLR with Lens EF-S 18-55mm - https://amzn.to/3xhgMzg
Memory Card For DSLR - https://amzn.to/3xhgMzg
Action Camera - https://amzn.to/366aard
Redmi Note 10 - https://amzn.to/3AkUsqc
Gimbal For Mobile - https://amzn.to/2UVVlVT
2nd Action Camera - https://amzn.to/3hwGn0a
Action Camera Accessories - https://amzn.to/2SGsXX4
GoPro Dual Battery Charger - https://amzn.to/3qGpWCN
Monopod For DSLR and Action Camera - https://amzn.to/3wjtmwE
विडिओ कसा झाले आहे हे नक्की कळवा आणि विडिओ आवडला तर आपला चॅनेल सबस्क्राईब करायलाही विसरू नका आम्ही अश्याच नवीन-नवीन ठिकाणांची माहिती आमच्या चॅनेल च्या माध्यमातून देत असतो. तुम्हाला जर काही मदत लागली तर तुम्ही मला आपल्या इंस्ट्राग्राम ( Travelij_ ) किंवा फेसबुक ( Travel IJ ) च्या पेज वर मॅसेज करू शकता मी नक्कीच माहिती देऊ शकेल.
-------------- How To Reach ---------------
https://maps.app.goo.gl/trq9U6thvDDrj...
---------------------------------------------------------
Hit LIKE and SUBSCRIBE !
Thank you for watching! If you enjoyed, please SUBSCRIBE us!