Перейти к содержимому

शंभरी पार आज्जीचे घनदाट 🌲 जंगलातील एकाकी जीवन बघा | या वयातही सांभाळते तब्बल २० गायी | payvata

Paayvata

0:00 / 0:00

शंभरी पार आज्जीचे घनदाट 🌲 जंगलातील एकाकी जीवन बघा | या वयातही सांभाळते तब्बल २० गायी | payvata

605 236 просмотров · 3 месяца назад
Paayvata
113 тыс. подписчиков
605 236 просмотров · 3 месяца назад
घनदाट 🌲 जंगलात एकच घर 🛖 आणि घरात राहते 100 वर्षीय आजी | सह्याद्रीच्या जंगलातील धाडसी वाघीण | payvata महाराष्ट्राच्या या अद्भुत आणि अलौकिक प्रवासाच्या पायवाटेवर आपले स्वागत आहे. सह्याद्रीच्या उंच डोंगर रांगेत, घनदाट जंगलात एक एकटेच घर आहे आणि घरात राहते एक १०० वर्षीय आज्जी. आज रस्ता चुकून जंगलात या आजीच्या घरापर्यंत मी पोहचले होतो. इथे पोहचलो तेव्हा आजी एकटीच घरी होती. आजी इथे तिच्या मुलाबरोबर राहते. मुलगा शेतातील काम, गायी गुर चरण्यासाठी रानात गेला की घरातील सर्व काम ही १०० वर्षाची आजी स्वतः करते. वय हा फक्त आकडा असते हे या आजीकडे बघितल्यावर आपल्या लक्षात येते. आजीशी बोलल्यानंतर समजले की तिचे माहेर हे माझ्या गावाच्या शेजारची एक वस्ती होती. त्यामुळे माझे वडिलांना त्या चांगल्या ओळखत होत्या. याच ओळखीचे रुपांतर मग दीर्घ गप्पांमध्ये झाले. आजी या वयातही एवढ सर्व काम कशी करते हा माझ्या साठी अजूनही अनुत्तरीत प्रश्न आहे. माहेरचा माणूस आलाय म्हणून तिला प्रचंड आनंद झाला होता सोबत वयामुळे आता कोणाला भेटता येत नाही याचे दुखःही होते. बऱ्याच गप्पा झाल्या तिच्या माहेरच्या आठवणींचा पेटारा आज अनेक वर्षांनतर तिने माझ्या समोर उघडला होता. आजीची अजून दोन मुलं आणि नातवंड रोजगारासाठी शहराकडे आहेत. तिला हव नको ते सर्व ही मुलं आणि नातवंड पुरवत असतात. वेळेप्रमाणे वरचे वर तिला भेटायला देखील येत असतात असे आजी कडून समजले. शहरातील हवा मला मानवत नाही शिवाय सार आयुष्य ह्या मातीत गेले त्यामुळे आयुष्याचा शेवट देखील इथेच व्हावा अशी तिची इच्छा आहे. म्हणून ती तिचे घर सोडून कुठे जात नाही. इथले डोंगर,जंगल, घरातील मुकी जनावरं हाच माझा संसार असे अभिमानाने सांगत होती. १०० वयातही एवढी उर्जा ही आजी कुठून आणत असेल हा अनुत्तरीत प्रश्न. काळाच्या ओघात तिचं शरीर थकलं असेल पण तिच्या जिद्दीचा दिवा मात्र आजही तेजाने पेटलेला आहे. अशा या सह्याद्रीच्या धाडसी वाघिणीला मनाचा सलाम.! --------------------------------------------------------------------------------------------------------- Instagram ID   / paayvata   Gmail: paayvata‪@gmail.com‬ --------------------------------------------------------------------------------------------------------- #nature #villagelife #marathi #pune #paayvata #sahyadri #konkan #maharashtra #aajji #graminnews #gramin #rurallife #dhangarijivan #dhangarijeevan #villagelifestyle #village #villagevlog #villagewomen #villagewomendailyroutine #women #womenlife #womenlifestyle #grandmother #grandmothers #grandmotherlove #junglelife #aai #आजी #आज्जी #आई #ग्रामीण_जीवन #मराठी #kokan #konkan #viralvideo #trendingvideo #travelvlog