रंगपंढरी Face-to-Face: Atul Parchure - Part 1
रंगपंढरी / Rang Pandhari
0:00 / 0:00
रंगपंढरी Face-to-Face: Atul Parchure - Part 1
46 603 просмотра · 6 лет назад
रंगपंढरी / Rang Pandhari
21,4 тыс. подписчиков
46 603 просмотра · 6 лет назад
'वासूची सासू', 'नातीगोती', 'तरुण तुर्क म्हातारे अर्क', 'बे दुणे पाच', 'ए भाऊ डोकं नको खाऊ', 'व्यक्ती आणि वल्ली', 'वा गुरु', 'आम्ही आणि आमचे बाप' अशा दर्जेदार कलाकृतींतून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे अतुल परचुरे हे जगभरातील मराठी रसिकांचे अतिशय आवडते नट.
'नातीगोती' मधील मतिमंद मुलाची आव्हानात्मक भूमिका सादर करताना देहबोलीचा केलेला अभ्यास, 'तरुण तुर्क' मधील विद्यार्थ्यांची व्यक्तिरेखा साकारताना बायकीपणा आणि बीभत्सपणा ह्यांत जाणीवपूर्वक केलेली फारकत, मिळालेल्या संवादातील सौंदर्यस्थळं शोधण्याची सवय, तसेच कुठलीही विनोदी भूमिका अधिक उठावदार करण्यासाठी 'विनोदाची दहीहंडी रचून फोडणे' अशा आपल्या अभिनय प्रक्रियेतील अनेक बारकाव्यांविषयी अतुल सर सांगताहेत, आजच्या भागात.