Перейти к содержимому

उपासनासंगीत क्र.191- प्रभु, मज तारण दे पतिताला ॥

Upasana Geet Gayan Abhiyaan Maharashtra

0:00 / 0:00

उपासनासंगीत क्र.191- प्रभु, मज तारण दे पतिताला ॥

9 998 просмотров · 1 г. назад
Upasana Geet Gayan Abhiyaan Maharashtra
4,24 тыс. подписчиков
9 998 просмотров · 1 г. назад
सर्व भक्तजनांस प्रभु येशुच्या नामात सहर्ष अभिवादन ! रविवारीच्या भक्ती-उपासनेत मंडळीला "उपासना संगीतातील" भक्तिगीतांच्या चाली मंडळीला अवगत होऊन, ही गीते सहजपणे गाता यावीत; या हेतुनं निरनिराळ्या गानवृंदाच्या समुहस्वरात ती ऐकविण्याचा आमचा प्रयत्न बऱ्याचशा अंशी सफल होत आहे, यासाठी ईश्वराला धन्यवाद ! या प्रयत्नासाठी आपणही या अभियानात सहभागी होऊन कार्यपूर्तीस प्रोत्साहन द्यावे अशी नम्र विनंती आहे. आजच्या रविवारी उपासनासंगीत क्र.191 वरील गीतात; आपल्या अंतर्मनात पश्चातापानं भरलेले विचार; कवी प्रभुसमोर मांडताना काकुळतीनं जे म्हणतो, ते सात्विक जीवन जगू पाहणाऱ्या भक्ताच्या मनाला न भावेल तरच नवल म्हणावं! स्वत:ला भक्तीमान समजणारा माणुस किती पापी असून शकतो, याचं अद्भुतपूर्ण वर्णन करताना राजकवी कृष्ण रत्न सांगळे आपल्या काव्यरचनेत स्वत:च्या तारणप्राप्तीसाठी काय याचना करतात ते ऐकुयात गीत रूपात ! गीताचे शब्द आहेत... "प्रभु,मज तारण दे पतिताला... " समुहसूरात गीत सादर करीत,आहे प्रभुगुणगान कलामंच, पुणे चा गानवृंद ! गीत ऐकल्यानंतर LIKE आणि SUBSCRIBE करायला मात्र विसरू नका. आपल्या चर्चक्वायर किंवा गानवृंदाला या उपक्रमात सहभागी होण्यासाठी अभियानाशी खालील दिलेल्या क्रमांकावर अवश्य संपर्क साधा. 9822639917, 9552596778. उपासनासंगीत क्र. १९१. तारणाप्रीत्यर्थ प्रार्थना प्रभु, मज तारण दे पतिताला. ।। ध्रु० ।। पुण्य नसे, प्रभु, संग्रहि माझ्या, । पाप परी अहिताला. ।।१।। दडपतसे मी बहु अघभारे; । जाइन मृत्युपथाला. ।।२।। वैद्य नसे प्रिय तुजविण ऐसा। सुधरिल पापक्षतांला. ।।३।। सर्वसमर्था, इच्छिसि तूहि, । स्मर तर याहि तिताला. ।।४।। काय करू मी सांग मला प्रभु, । सुखा व्हाया जिविताला. ।।५।। पतितांचा तू मित्र, अहा दे। कान विनंतिगिताला. ।।६।। कवी : कृष्ण रत्न सांगळे (१८३४ - १९०८) गानवृंदातील सहभागी संगीतप्रेमी साधना रणदिवे सीमा गोरे श्रेयाली गायकवाड आशिष आढाव लुसी आढाव क्लेरा काळे एलिझाबेथ विधाते शुभांगी सदनखर आशिष आरोळे वादक प्रिती निर्मल - सिंथेसायझर आशिष आढाव - सिंथेसायझर आणि तालवाद्ये नयन रणदिवे - हार्मोनियम राजन तेलोरे - तबला अनिल जाधव - खंजिरी ऑडिओ रेकॉर्डिंग पीटर गायकवाड ( युबीएस स्टुडिओ) व्हिडीओग्राफी ओजस चव्हाण ----------------------------------------- विशेष आर्थिक सहाय्य आर्थिक मा. शिरीष देसाई प्रिती निर्मल सक्रीय व्यवस्थापन मा.रेव्ह. सुधीर चव्हाण ख्रिस्ती मंडळी चर्च ताडीवाला रोड, पुणे ----------------------------------------- निर्मिती उपासना गीत-गायनअभियान,पुणे संपर्कासाठी: 98226 39917 95525 96778 #marathichristianhymns #marathichristiansongs #marathigane #MarathiChristianupasanageete #chrstian #MarathChristglorify