Перейти к содержимому

मोहाडमल्ला || आरती || मोहाडी गावं || @kishorjadhav7973 ✍️लेखक. किशोर गणपत जाधव

Business शेतकरी

0:00 / 0:00

मोहाडमल्ला || आरती || मोहाडी गावं || @kishorjadhav7973 ✍️लेखक. किशोर गणपत जाधव

802 просмотра · 2 недели назад
Business शेतकरी
25 подписчиков
802 просмотра · 2 недели назад
धृपद : जय देव जय देव । जय मोहाडमल्ला । भक्तांच्या रक्षणा । धावून आला ॥ जय देव जय देव । जय मोहाडमल्ला । मोहाडी गावाचे । तुम्ही रक्षण करता ॥ १. दीनांच्या दुःखाचा । हरिला भार । कृपेचा वर्षाव । तुझा अपार । तुझ्या नामाने । होई उद्धार । जय जय गुरुवर्या । मोहाडमल्ला ॥ धृपद : जय देव जय देव । जय मोहाडमल्ला । मोहाडी गावाचे । तुम्ही रक्षण करता ॥ २. शंकराचा अवतार । दैवी तुझी माया । भक्तांच्या संकटात । धावून आला । तुमच्या चरणी । माथा टेकती सारे । भक्तांच्या मनातील । इच्छा पूर्ण होती सारे ॥ जय जय गुरुवर्या । मोहाडमल्ला ॥ धृपद : जय देव जय देव । जय मोहाडमल्ला । मोहाडी गावाचे । तुम्ही रक्षण करता ॥ ३. मोहाडी नगरी । पवित्र तुझे धाम । भक्त येती घेऊन । श्रद्धेचे नाम । मोहाडी गाव । तुझे कीर्तीस्थान । तुझ्या चरणी मिळे । सुख समाधान ॥ जय जय गुरुवर्या । मोहाडमल्ला ॥ धृपद : जय देव जय देव । जय मोहाडमल्ला । मोहाडी गावाचे । तुम्ही रक्षण करता ॥ ४. नवस केला । जो भक्तीभावे । कृपेने त्याचे । काम तुम्ही साधावे । अखाडी बोहडा । उत्सव तुमच्या चरणी । वाद्यांच्या तालावर । नाचती देवमयी झोळी ॥ जय जय गुरुवर्या । मोहाडमल्ला ॥ धृपद : जय देव जय देव । जय मोहाडमल्ला । मोहाडी गावाचे । तुम्ही रक्षण करता ॥ ५. कृपेची छाया । ठेविसी माथी । दूर करिसी । संकटे सर्वांची । तुझ्या नामाची । गोडी अनंती । जय मोहाडमल्ला । करुणाघना ॥ धृपद : जय देव जय देव । जय मोहाडमल्ला । मोहाडी गावाचे । तुम्ही रक्षण करता ॥ ६. आरती ओवाळू । प्रेमभावे । तुझ्या चरणी । मस्तक ठेवू भावे । भक्तीचा मार्ग । दाखविसी नवे । जय देव जय देव । मोहाडमल्ला ॥ जय देव जय देव । मोहाडमल्ला ॥ धृपद : जय देव जय देव । जय मोहाडमल्ला । मोहाडी गावाचे । तुम्ही रक्षण करता ॥ जय देव जय देव । जय मोहाडमल्ला । मोहाडी गावाचे । तुम्ही राखणवाला ॥ लेखक ~किशोर गणपत जाधव व्हिडिओ ~ गणेश संजय चांडोले ( फोटोग्राफी)