Перейти к содержимому

रघुवंशी समाज श्रीराम व्यायमशाला नंदुरबार श्री गणेश विसर्जन मिरवणूक 2026

हिन्दुसेवक

0:00 / 0:00

रघुवंशी समाज श्रीराम व्यायमशाला नंदुरबार श्री गणेश विसर्जन मिरवणूक 2026

4 852 просмотра · 2 нед. назад
हिन्दुसेवक
19 подписчиков
4 852 просмотра · 2 нед. назад
धार्मिक-सामाजिक उपक्रमांतून ‘श्री राम व्यायाम शाळे’चा गणेशोत्सव दणक्यात साजरा सुंदरकांड, महाप्रसादासह विविध सांस्कृतिक उपक्रमांनी गणेशोत्सवाला लाभली भक्ती आणि उत्साहाची झालर नंदुरबार : धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून समाजाशी आपले घट्ट नाते निर्माण करणाऱ्या रघुवंशी समाज श्री राम व्यायाम शाळेने यंदाही गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा केला. विविध धार्मिक विधींसोबतच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून गणेशोत्सवाला सामाजिक एकोप्याची आणि सांस्कृतिक समृद्धीची जोड देण्यात आली. गणेशोत्सवानिमित्त आयोजित सुंदरकांड पठण व महाप्रसाद वितरण कार्यक्रमाला हनुमानभक्त तसेच गणेशभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मोठ्या संख्येने भाविकांनी सुंदरकांडाचा लाभ घेत महाप्रसादाचा आस्वाद घेतला. उत्सवाच्या निमित्ताने रांगोळी स्पर्धेसह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. रांगोळी स्पर्धेसाठी नगराध्यक्षा रत्नाताई रघुवंशी आणि कविता रघुवंशी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. या स्पर्धेचे नियोजन हिना आनंद रघुवंशी, नितिका अमन रघुवंशी, विशाखा चंद्रशेखर रघुवंशी आणि गायत्री पवन रघुवंशी यांनी केले. दोन गटांत झालेल्या या स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. विशेष म्हणजे, सर्व सहभागी स्पर्धकांनाही भेटवस्तू देऊन त्यांचा उत्साह वाढविण्यात आला. याशिवाय वंश रघुवंशी यांच्या उपस्थितीत सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले. गणेशमूर्तीच्या स्थापना आरतीचा मान शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आमदार चंद्रकांत रघुवंशी आणि नगरसेवक विलास रघुवंशी यांना मिळाला. तर विसर्जन आरती रघुवंशी समाजातील ज्येष्ठ उद्योजक तथा समाजसेवक पृथ्वीराज रघुवंशी आणि नगरसेवक अमित भैया रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आली. हा गणेशोत्सव यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष प्रथमेश अशोक रघुवंशी, उपाध्यक्ष आर्यन केतन रघुवंशी, खजिनदार अमित दीपकसिंग रघुवंशी आणि सचिव विवेक सतीशसिंग रघुवंशी यांच्यासह श्री राम व्यायाम शाळेच्या युवा कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. धार्मिक श्रद्धेला सामाजिक बांधिलकीची आणि सांस्कृतिक उपक्रमांना युवकांच्या उत्साहाची जोड देत ‘श्री राम व्यायाम शाळे’ने गणेशोत्सवाची आपली आगळीवेगळी कार्यशैली यंदाही अधोरेखित केली.