Перейти к содержимому

🚂 ज्ञान एक्सप्रेस | From Fire to AI 🤖 | Ganpati Decoration 2026 | Technology Evolution

ShaktiShali

0:00 / 0:00

🚂 ज्ञान एक्सप्रेस | From Fire to AI 🤖 | Ganpati Decoration 2026 | Technology Evolution

114 просмотров · 3 нед. назад
ShaktiShali
39 подписчиков
114 просмотров · 3 нед. назад
बाप्पांच्या सुवर्ण सिंहासनाभोवती फिरणारी आमची ज्ञान एक्सप्रेस — ज्ञान, विवेक, तंत्रज्ञान आणि प्रगती या चार डब्यांसह — पाच युगांचा प्रवास घडवते. पहिल्या स्थानकात पाषाणयुग: गुहा, धबधबा, गुहेतील चित्रं, आणि खरोखर पेटणारा अग्नी. दुसऱ्या स्थानकात औद्योगिक युग: वाफेची शक्ती, कारखाने, धुराडे आणि फिरणारे गिअर्स. तिसऱ्या स्थानकात विजेचं युग: जुना रेडिओ, कॅसेट प्लेअर आणि टीव्हीवर दूरदर्शनच्या काळाची आठवण — तेव्हा घरात एकच वाहिनी असायची. चौथ्या स्थानकात संगणक युग: खरा जुना की-बोर्ड, माऊस, फ्लॉपी डिस्क आणि स्क्रीनवर जिवंत Windows 98. आणि पाचव्या स्थानकात आजचं युग: क्लाउड, आय ओ टी आणि ए आय. पर्यावरणाचा संदेश: तंत्रज्ञान वाढलं, तसा वाढला इलेक्ट्रॉनिक कचरा — जगातला सर्वात वेगाने वाढणारा कचरा. म्हणूनच हा संपूर्ण देखावा पुनर्वापरातून साकारला आहे: जुने पुठ्ठ्याचे खोके, खरा जुना की-बोर्ड, फ्लॉपी डिस्क, माऊस, कापूस, एल ई डी दिवे आणि घरातील ई-कचरा. जुन्या वस्तू फेकण्याआधी विचार करा; त्यांना नवं रूप देता येतं. Reduce, Reuse & Recreate — हीच खरी पर्यावरणसेवा. ज्ञानाला विवेकाची दिशा मिळाली, तरच ती खरी प्रगती. गणपती बाप्पा मोरया! — वैशाली शिंपी, डॅलस, टेक्सास (अमेरिका)