Перейти к содержимому

संपूर्ण काकड आरती भजन । Sampurna Kakad Aarti Bhajan

Prathmesh Kale

0:00 / 0:00

संपूर्ण काकड आरती भजन । Sampurna Kakad Aarti Bhajan

2 769 просмотров · 1 месяц назад
Prathmesh Kale
11 подписчиков
2 769 просмотров · 1 месяц назад
Timestamps - 0:00:00 राम कृष्ण हरी भजन 0:00:51 रूप पाहतां लोचनीं । सुख जालें वो साजणी 0:02:55 वचन ऐका हो कमलापती | मज रंकाची विनंती 0:04:38 तुज पाहतां सामोरी । दृष्टी न फिरे माघारी 0:06:16 तुम्ही सनकादिक संत | म्हणविता कृपावंत 0:08:10 आता तुम्ही कृपावंत | साधुसंत जीवलग 0:10:07 लेकुरांचे हित | ध्यानी माउलीचे चित्त 0:11:43 करुनि उचित । प्रेम घालीं हृदयांत 0:13:41 न करीं उदास | माझी पुरवावी आस 0:14:31 गरुडाचे पायीं। ठेवी वेळोवेळां डोईं 0:15:53 येग येग विठाबाई । माझे पंढरीचे आई 0:17:51 जगीं विठ्‌ठल रुक्मिणी । तुह्मी अखंड स्मरा ध्यानी 0:19:38 विठोब्बा रखुमाई भजन 0:19:57 सुंदर तें ध्यान उभे विटेवरी । कर कटावरी ठेवूनियां 0:20:26 राजस सुकुमार मदनाचा पुतळा । रविशशिकळा लोपलिया 0:20:59 सदा माझे डोळा जडो तुझी मुर्ती | रखुमाईच्या पती सोयरिया 0:21:27 आवडे हे रूप गोजिरे सगुण | पाहता लोचन सुखावले 0:21:53 झणीं दृष्ट लागो तुझ्या सगुणपणा | जेणें माझ्या मना बोध केला 0:22:19 पाहातां श्रीमुख सुखावलें सुख । डोळियांची भूक न वजे माझ्या 0:23:18 नको ब्रह्मज्ञान आत्मस्थितीभाव । मी भक्त तू देव ऐसे करी 0:24:26 विठोब्बा रखुमाई भजन 0:24:45 उठा उठा साधु संत| साधा आपुलाले हित राम कृष्ण हरी रूप पाहतां लोचनीं । सुख जालें वो साजणी ॥१॥ तो हा विठ्ठल बरवा । तो हा माधव बरवा ॥२॥ बहुतां सुकृतांची जोडी । म्हणुनि विठ्ठलां आवडी ॥३॥ सर्व सुखाचें आगर । बाप रखुमादेवीवर ॥४॥ वचन ऐका हो कमलापती | मज रंकाची विनंती || धृ || कर जोडितो कथे काळी | आपण असावे जवळी || १ || घेई घेई माझी भाक | जरी कां मागेन आणिक || २ || तुक्या बंधु म्हणे देवा | शब्द इतुकाची राखावा || ३ || तुज पाहतां सामोरी । दृष्टी न फिरे माघारी ॥१॥ माझें चित्त तुझ्या पायां । मिठी पडिली पंढरिराया ॥ध्रु.॥ नव्हे सारितां निराळें । लवण मेळवितां जळें ॥३॥ तुका म्हणे बळी । जीव दिला पायांतळीं ॥४॥ तुम्ही सनकादिक संत | म्हणविता कृपावंत ||1|| एवढा कर उपकार | सांगा देवा नमस्कार ||2|| माझी भाकावी करूणा | विनवी पंढरीचा राणा ||3|| तुका म्हणे मज आठवा | मूळ लवकरी पाठवा ||4|| आतां तुम्ही कृपावंत | साधुसंत जीवलग ||1|| गोमटे ते करा माझें | भार ओझें तुम्हासी ||2|| वंचिलें पायां-पाशी | नाही यासी वेगळें ||3|| तुका म्हणे सोडिल्या गांठी | दिली मिठी पायांसी ||4|| लेकुराचे हित | पाहे माऊलीचे चित्त ||1|| ऐसी कळवळ्याची जाती | करी लाभाविण प्रिती ||धृ|| पोटी भार वाहे | त्याचे सर्वस्वही साहे ||2|| तुका म्हणे माझे | तुम्हा संतावरी ओझे ||3|| करुनि उचित । प्रेम घालीं हृदयांत ॥ १॥ आलों दान मागायास । थोरी करूनियां आस ॥ ध्रु.॥ चिंतन समयीं । सेवा आपुली च देई ॥ २॥ तुकयाबंधु म्हणे भावा । मज निरवावें देवा ॥ ३॥ न करीं उदास | माझी पुरवावी आस ||१|| ऐका ऐका नारायणा | माझी परिसा विज्ञापना ||२|| मायबाप बंधुजन | तूंचि सोयरा सज्जन ||३|| तुका म्हणे तुजविरहित | कोण करिल माझें हित ||४|| गरुडाचे पायीं। ठेवी वेळोवेळां डोईं। १। वेगीं आणावा तो हरी। मज दीनाते उद्धरी। २। पाय लक्ष्मीच्या हातीं। म्हणोनि येतो काकुळती। ३। तुका म्हणे शेषा। जागे करा हृषिकेशा। ४। येग येग विठाबाई । माझे पंढरीचे आई ॥१॥ भीमा आणि चंद्रभागा । तुझे चरणींच्या गंगा ॥२॥ इतुक्यासहित त्वां बा यावें । माझे रंगणीं नाचावें ॥३॥ माझा रंग तुझिया गुणीं । ह्मणे नामयाची जनी ॥४॥ जगीं विठ्‌ठल रुक्मिणी । तुह्मी अखंड स्मरा ध्यानी ॥१॥ मग तुज काय उणें । झाले सोयरे त्रिभुवनें ॥२॥ साराचें जें सार । भवसिंधु उतरी पार ॥३॥ मन ठेउनी चरणीं । म्हणे नामयाची जनी ॥४॥ more lyrics in pinned comment -