Перейти к содержимому

EP-03 || कोकणातिल पांढऱ्या वाळूचा सुंदर समुद्र किनारा || शिरोडा (आरवली ) गावातिल वेतोबा मंदिर ||

Devgadcha Raja

0:00 / 0:00

EP-03 || कोकणातिल पांढऱ्या वाळूचा सुंदर समुद्र किनारा || शिरोडा (आरवली ) गावातिल वेतोबा मंदिर ||

224 просмотра · 3 г. назад
Devgadcha Raja
4,02 тыс. подписчиков
224 просмотра · 3 г. назад
श्री देव वेतोबा देवस्थान, वेंगुर्ले वेंगुर्ले पासून साधारण 15 किमी अंतरावर आरवली या गावात हे जागृत देवस्थान आहे. काळ्या पाषाणातील 40 फूटी उंच उभी श्री वेतोबाची मूर्ती बघताच श्रद्धेने मान खाली जाते आणि आपोआप हात जोडले जातात. मित्रांनो या देवाला बोलले जाणारे नवस देखील खुप निराळे आहेत आणि त्याचीसुद्धा एक विस्मयकारी कथा आहे. या देवाला नवसाला म्हणून कोल्हापुरी चपलांचा जोड आणि सोनकेळयांचा घड वाहिला जातो. इथल्या रहिवाशांच असं म्हणंण आहे कि आजही वेतोबा रात्री संपूर्ण गावात फिरुन या गावाच रक्षण करतो. त्यावेळी याच नवसाच्या चपलांचा वापर होतो. साधारण 4 ते 5 फुट लांब रुंद कोल्हापुरी जोड आज वाहिले की नंतर ते झिजलेले असतात. महाराष्ट्र राज्यातील, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, वेंगुर्ले तालुक्यामध्ये, आरवली गावचे क्षेत्रपाल श्री देव वेतोबा मंदिर हे सर्वात प्रसिद्ध आणि भक्तांच्या इच्छांची पूर्तता करणाऱ्या देवस्थानांपैकी एक आहे, असे मानण्यात येते. अरबी समुद्राच्या पायथ्याशी असलेल्या गावांमध्ये क्षेत्रपाल श्री देव वेतोबा ची आराधना केली जाते. त्याला प्रलयवेताळ, ज्वालावेताळ, आग्यावेताळ या नावाने देखील ओळखले जाते. या क्षेत्रपाल श्री देव वेतोबाचा इतिहास नक्की काय आहे? हे मंदिर कधी बांधले गेले? वेंगुर्ले शहरापासून जवळपास १२ किलोमीटरच्या अंतरावर निसर्गरम्य अशा आरवली गावचे ग्रामदैवत म्हणून क्षेत्रपाल वेतोबा देवाला ओळखले जाते. आरवली पंचक्रोशीतच नव्हे तर संपूर्ण दक्षिण कोकणचा संकट निवारक म्हणून जनतेमध्ये श्रद्धास्थान आहे. असे म्हटले जाते की, सतराव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात मूळ मूर्ती जवळच्या डोंगरातून आणून बसवली होती. तेव्हा ही मूर्ती फणसाच्या लाकडापासून कोरली गेली होती. आणि म्हणूनच दर शंभर वर्षांनी त्या मूर्तीची पुन्हा स्थापना करावी लागत असे. आता तेथील एका स्थानिक शिल्पकाराने पंचधातूची मूर्ती बनवली आहे आणि १९९६ मध्ये त्याची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. त्याच्या एका हातात तलवार आणि दुसऱ्या हातात घडा दिसत आहे. वेंगुर्ला तालुक्यातील आरवली गाव हे श्री वेतोबा देवस्थानामुळे तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध झाले आहे. ” महानंदा ” या श्री जयवंत दळवी यांच्या कांदबरी त या देवाचा उल्लेख आढळतो. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा आणि वैशाख शुद्ध पंचमीचा त्याचा स्थापना दिवस मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो. या उत्सवांच्या वेळी वेतोबाचे दर्शन आणि आशीर्वाद घेण्यासाठी हजारो भावीक येत असतात. पूर्वी फणसाच्या लाकडापासून वेतोबाची मूर्ती कोरली जायची. त्यामुळे दर १०० वर्षांनी ती पुन्हा स्थापन करावी लागत असे. १९९६ साली येथील एका स्थानिक कलाकाराने पंचधातूची वेतोबाची मूर्ती बनवली आणि त्याची प्रतिष्ठापना करण्यात आली. या देवाला नैवेद्य म्हणून केळ्याचा घड दिला जातो. तसेच आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी कोल्हापुरी चामड्याची चप्पल जोड या देवाला अर्पण केली जाते. #devgadcha raja #youtubeshorts #instagram #explore #watchtime #marathivlog #instagramstatus #whatsappstatus #kokan_status #journey #kokanivideos #kokani #kokanvideo #bestplacesinkokan ##kokanchimansa #kokannow #beachesinkokan #sateridevi #vetobamandir #kokanmandir #templesinkokan #crabscatching #snakevideo #snakerescue #touristattraction #kids #music #kokanmusic #bestplacetovisit #pausatilkokan #dailyvlog #bestyoutuber #kokancomedyvlog #kokankar #traveltokokan #trending #touristattraction #journey #lifestyle #lalpari #short #shorts #whatsapp #affordable #kokanimajja