Перейти к содержимому

घरगुती गणेश दर्शन भाग - 1 | मुंबईतील 4 अनोखे घरगुती गणपती देखावे ! 😍लालपरीत बाप्पा,समुद्रातील रहस्य

Jara hatake

0:00 / 0:00

घरगुती गणेश दर्शन भाग - 1 | मुंबईतील 4 अनोखे घरगुती गणपती देखावे ! 😍लालपरीत बाप्पा,समुद्रातील रहस्य

16 912 просмотров · 2 дня назад
Jara hatake
18,8 тыс. подписчиков
16 912 просмотров · 2 дня назад
मुंबईतील घरगुती गणपती म्हणजे फक्त बाप्पाचे दर्शन नाही, तर कल्पकता, कला, संस्कृती आणि सामाजिक संदेश यांचा सुंदर संगम! 🙏🚩 या Vlog मध्ये आपण पाहणार आहोत मुंबईतील तीन हटके आणि कल्पक घरगुती गणपती देखावे. 🚍 पराग सावंत यांचा देखावा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेली आपली एसटी अर्थात ‘लालपरी’ आणि त्यात विराजमान झालेले बाप्पा! या देखाव्यातून लालपरीच्या माध्यमातून कोकणची परंपरा, संस्कृती, जीवनशैली आणि कोकण प्रवासाचा सुंदर अनुभव मांडण्यात आला आहे. 🌊 अभिषेक चिटणीस यांचा घरगुती गणपती देखावा मुंबईच्या गजबजलेल्या शहरी जीवनामागे दडलेली समृद्ध सागरी जैवविविधता या देखाव्यातून मांडण्यात आली आहे. विशेष आकर्षण म्हणजे ‘Goniobranchus bombayanus’ या रंगीबेरंगी समुद्री जीवाच्या माध्यमातून मुंबईच्या समुद्रविश्वाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे. तसेच मुंबईच्या समुद्रकिनाऱ्याचे वास्तव आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश या देखाव्यातून देण्यात आला आहे. 🦚 ओमकार राणे – ‘राण्यांचा मोरया’ काळाचौकी, मुंबई येथील ओमकार राणे यांच्या घरगुती गणपतीचा देखावा दरवर्षी सोशल मीडियावर आकर्षणाचा विषय ठरतो. यंदाच्या देखाव्यातील अप्रतिम कल्पकता, प्रकाशयोजना (Lighting Effects) आणि पाण्याचे वातावरण पाहणाऱ्यांचे लक्ष वेधून घेते. या तीनही देखाव्यांमध्ये बाप्पाच्या भक्तीसोबतच कला, संस्कृती, पर्यावरण आणि कल्पकतेचा सुंदर मिलाफ पाहायला मिळतो. व्हिडिओ आवडला तर ❤️ LIKE करा, आपल्या मित्र-मैत्रिणी आणि गणेशभक्तांसोबत SHARE करा आणि @Jara_hatake चॅनेलला SUBSCRIBE करायला विसरू नका! 🔔 🙏 गणपती बाप्पा मोरया! 🚩 #GanpatiBappaMorya #GanpatiDarshan #MumbaiGanpati #GharghutiGanpati #GanpatiDecoration #GanpatiUtsav #JaraHatake