Перейти к содержимому

2026 09 08 | कठोपनिषद | अध्याय १ • वल्ली १ | श्लोक १–६ | नचिकेताची कथा | नीलिमा कुलकर्णी

Neelima Kulkarni

0:00 / 0:00

2026 09 08 | कठोपनिषद | अध्याय १ • वल्ली १ | श्लोक १–६ | नचिकेताची कथा | नीलिमा कुलकर्णी

182 просмотра · 2 недели назад
Neelima Kulkarni
181 подписчик
182 просмотра · 2 недели назад
कठोपनिषद | अध्याय १ • वल्ली १ | श्लोक १–६ कठोपनिषद हे उपनिषदांमधील अत्यंत सुंदर, गूढ आणि चिंतनशील उपनिषद आहे. नचिकेता आणि यमराज यांच्या संवादातून आत्मज्ञान, मृत्यूचे रहस्य, जीवनाचे ध्येय आणि परम सत्याचा शोध यांचा उलगडा होत जातो. या व्हिडिओमध्ये अध्याय १, वल्ली १ मधील श्लोक १ ते ६ यांचा अभ्यास केला आहे. या प्रारंभीच्या मंत्रांमध्ये आपण पाहतो — 🔸 वाजश्रवसांचा विश्वजित यज्ञ आणि सर्वस्वदान 🔸 दानासाठी दिल्या जाणाऱ्या वृद्ध व निष्प्रयोज्य गायी पाहून नचिकेताच्या मनात निर्माण झालेला प्रश्न 🔸 नचिकेताच्या अंतःकरणात जागृत झालेली श्रद्धा 🔸 “मी कोणाला दान केला जाईन?” हा नचिकेताने पित्याला विचारलेला प्रश्न 🔸 वारंवार प्रश्न विचारल्यानंतर पित्याच्या मुखातून निघालेले — “मृत्यवे त्वा ददामि” — “मी तुला मृत्यूला देतो” हे शब्द 🔸 आणि त्या प्रसंगानंतर नचिकेताने केलेले जीवन-मृत्यूविषयक गंभीर चिंतन या पहिल्याच सहा मंत्रांमधून नचिकेताचे विलक्षण व्यक्तिमत्त्व आपल्या समोर उभे राहते — सत्य जाणून घेण्याची जिज्ञासा, धर्म-अधर्माचा सूक्ष्म विचार, श्रद्धा, निर्भयता आणि आत्मचिंतन. नचिकेताची ही कथा केवळ एका बालकाची कथा नसून “जीवन म्हणजे काय? मृत्यू म्हणजे काय? आणि या दोन्हींच्या पलीकडे असणारे सत्य कोणते?” या सनातन प्रश्नांच्या शोधाची सुरुवात आहे. प्रस्तुतीकरण: नीलिमा कुलकर्णी विषय: कठोपनिषद — अध्याय १, वल्ली १, श्लोक १–६ #कठोपनिषद #Kathopanishad #नचिकेता #Nachiketa #उपनिषद #Upanishad #आत्मज्ञान #आत्मविद्या #यमराज #वेदांत #Vedanta #सनातनधर्म #भारतीयतत्त्वज्ञान #संस्कृत #अध्यात्म #Spirituality #NeelimaKulkarni