Перейти к содержимому

Junnar Bhatkanti|Maharashtra Forts|जुन्नर भटकंती-Part 14|कुकडेश्वर मंदिर|Kukdeshwar Temple

YogiBabaVlogs

0:00 / 0:00

Junnar Bhatkanti|Maharashtra Forts|जुन्नर भटकंती-Part 14|कुकडेश्वर मंदिर|Kukdeshwar Temple

1 784 просмотра · 8 лет назад
YogiBabaVlogs
5,98 тыс. подписчиков
1 784 просмотра · 8 лет назад
कुकडेश्वर शिवालय हे महाराष्ट्रातील पुरातन काळी बांधलेल्या दगडी मंदिरांपैकी एक आहे. अखंड दगडात केलेले कोरीव काम आणि स्थापत्य कलेचा उत्तम आविष्कार असलेले हे मंदिर तुलनेने अप्रसिद्ध आहे. सदर मंदिर पांडवकालीन असल्याचे समजले जाते. प्रत्यक्षात इ. स. ७५० ते ८५० च्या आसपास शिलाहारांनी हे मंदिर बांधले असा उल्लेख आढळतो. या मंदिरापासून कुकडी नदीचा उगम होतो. पुढे याच नदीवर माणिकडोह धरण आहे. कुकडेश्वर शिवालय कुकडी नदीच्या तीरावर,पुर गावी. जुन्नर-घाटघर रस्त्यावर,नाणेघाट जवळ चावंड (जुंड उर्फ प्रसन्नगड) या किल्ल्याच्या जवळ पुर नावाचे गाव आहे.वस्तिपासून थोडेसे अलग,कुकडी नदीच्या तीरावर एक पुरातन शिवालय आहे.कुकडी नदीच्या तीरावर असल्यामुळे याचे नाव 'कुकडेश्वर' असे पडले.तसा हा परिसर पुरातन शिल्पे आणि विरगळी यांनी भरलेला आहे.मंदीर पश्चिमाभिमुखी आहे. मंदिराच्या बाहेरील भिंतीवर,आतमधे आणि अगदी गाभार्यापर्यंत सुरेख शिल्पे आहेत.मंदिरामधे प्रवेश करताना दरवाज्यावर असणारी वेलबट्टी (द्वारशाखा) अप्रतिम आहे. मंदिराच्या सभामंडपाच्या खांबावर उत्कृष्ट कलाकुसर आहे.गाभारा छोटा आहे पण ऐस पैस जागा आहे.आतले शिवलिंग हे आकाराने लहान पण सुबक आहे.मंदिराच्या बाह्य अंगावर 2 अप्रतिम शिल्पे आहेत.डाव्या आणि उजव्या बाजूला ही ठेवण्यात आली आहेत.ह्यांना वेताळ अथवा कीर्तिमुखे म्हणतात. शंकराच्या पुरातन मंदिरामधे शक्यतो कालभैरव,गण,वेताळ,कीर्तिमुखे आढळून येतात.या ठिकाणी असणारी शिल्पे वेताळ आहेत का कीर्तिमुखे हा वाद असला तरी आहेत अप्रतिम. तसेच इथली 2 शिवशिल्पे विशेष आहेत.एक पाय खाली सोडून बसलेली शिवमूर्ति तसेच नृत्यमग्न शंकर हेही पाहन्यासारखे.. तसेच कमलामधे नृत्य करणारी नर्तकी,दोन स्त्रीमूर्ति,गद्देगल,सती शीला,शिवपार्वती शिल्प,नागशिल्पे अत्युकृष्ट आणि अवर्णनीय. Kukdeshwar Temple is located in Pune District of Maharashtra, India. It is about 15 km west of Junnar and lies on the banks of Kukdi River. It is a Shiv temple noted for its beautiful sculptures and carvings. The roof of this temple is in a dilapidated state. Chavand fort, also known as Prasannagad, is approximately 3 km from Kukdeshwar temple. Nearest Town is Junnar. Like, Share, subscribe Subscribe:    / @yogibabavlogs   Facebook:   / chavan.yogesh3118   Facebook Page:   / yogeshwild666     / 825803034249368     / herp-and-shoot-207973026033441   Google Plus: https://plus.google.com/1005891406162... Instagram:   / maharashtra_yogibabavlogs