प्रवचन १४ II श्रीमत्-ज्ञानेश्वरी II आत्मानुभूती व त्याप्राप्तीच्या साधनेचे माऊली प्रसाद प्रकटन
Madhav Domkondwar
0:00 / 0:00
प्रवचन १४ II श्रीमत्-ज्ञानेश्वरी II आत्मानुभूती व त्याप्राप्तीच्या साधनेचे माऊली प्रसाद प्रकटन
8 просмотров · 1 г. назад
Madhav Domkondwar
51 подписчик
8 просмотров · 1 г. назад
"आजच्या प्रवचनातील विषय"
अध्याय २ श्लोक ४८ मध्ये गीतेतील दोन प्रमुख साधना सांगीतल्या आहेत. 'संगं त्यक्त्वा' आणि 'समत्वम् योग उच्यते'. या प्रवचनात 'संगं त्यक्त्वा' ही साधना स्पष्ट केली आहे. तर पुढील म्हणजे पंधराव्या प्रवचनात 'समत्वम् योग उच्यते' ही साधना स्पष्ट करण्यात येईल.
'संगं त्यक्त्वा' ही साधना स्पष्ट होण्यासाठी 'संग' या शब्दाचे भाषांतर 'आसक्ती' असे करणे खूपच अपुरे आहे. संगाचा म्हणजे 'मी कर्ता -भोक्ता आहे' तसेच 'मी व माझे' यांद्वारे, जो संसाराशी संग म्हणजे संबंध, जो जन्मोजन्मीपासून तयार झाला आहे व चित्तातल्या कुठल्या ना कुठल्या वृत्तीप्रवाहाद्वारे अर्थात मनातील शब्दप्रवाहाद्वारे सतत अनुभवास येत आहे, त्या संगाचा म्हणजे संबंधाचा त्याग करावयाचा आहे. 'संग' याचा अर्थ 'संबंध' आणि 'संगं त्यक्त्वा' हा विषय या प्रवचनात स्पष्ट केला आहे.
"प्रवचनकर्त्याबद्दल"
"II श्रीमत्-ज्ञानेश्वरी II आत्मानुभूती व त्याप्राप्तीच्या साधनेचे माऊली प्रसाद प्रकटन" या श्री. माधव विश्वनाथ दोमकोंडवार उपाख्य राम जांबकर अर्थात गुरुवर्य श्री. माधवकाका यांनी लेखन केलेल्या ग्रंथाच्या अभ्यासासाठी उपयुक्त अशी स्वत: लेखनकर्त्याच्या रसाळ वाणीतून उतरलेली प्रवचने आहेत.
"प्रवचनमालिकेचा व ग्रंथलेखनाचा उद्देश"
वारकरी पंथातील अभ्यासू साधक ज्ञानाने परिपूर्ण असतात, व आधुनिक तरूणवर्ग आधुनिक गुरूंच्या ध्यानवर्गांचा लाभ घेऊन, ध्यानाभ्यासात पुढे गेलेले असतात. मात्र या दोन्ही प्रकारचे साधक "तळहातावरील रत्नाप्रमाणे आत्म्याची अनुभूती घेण्याच्या अनुभवापासून वंचित राहतात. या सर्वांना साह्यभूत ठरेल अशी, या दोन भागातील साधारण १५०० पृष्ठांच्या ग्रंथाची व या ग्रंथांचा सामुदायीक अभ्यास करण्यासाठी आयोजित केलेल्या अभ्यासवर्गाच्या निमित्ताने दिलेल्या प्रवचनांची रचना आहे.
मुमुक्षू साधकांनी जरूर या प्रवचनांचा व ग्रंथाच्या खण्ड १ व २ चा लाभ घ्यावा. ग्रंथांची श्री.माऊली मंदीर, श्री क्षेत्र आळंदी देवाची, येथील मंदीर प्रशासनाच्या ग्रंथ विक्री केंद्रात अत्यल्प देणगी मूल्यामध्ये उपलब्धता आहे.