झटपट तयार करा या पद्धतीने खमंग डाळ वडे सोबत चटकदार चटणी | Homemade Dal Vada Recipe
Gharcha Swaad
0:00 / 0:00
झटपट तयार करा या पद्धतीने खमंग डाळ वडे सोबत चटकदार चटणी | Homemade Dal Vada Recipe
1 330 063 просмотра · 7 л. назад
Gharcha Swaad
1,27 млн подписчиков
1 330 063 просмотра · 7 л. назад
How To Make Dal Vada At Home | Dal Vada Recipe | Dal Vade | डाळ वडे रेसीपी | Simple Recipe By Gharcha Swaad
OUR ANOTHER CHANNEL 👉🏽 / mihaykoli
साहित्य 👉 १ कप मुगाची डाळ, ½ कप उडद डाळ, ½ कप चणाडाळ, ५/६ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, ३ tblsp बारीक चिरलेली कोथिंबीर, ७/८ काडिपत्ते चिरून घेतलेले, ½ tblsp धणे पावडर, चिमूटभर हिंग, १ tblsp जीरे, १ कांदा बारीक चिरलेला, १½ tblsp ठेचलेले आले लसूण, तळण्याकरिता तेल आणि चवीनुसार मीठ.
चटणीसाठी साहित्य 👉 १½ tblsp ओल्या नारळाचे काप, ½" आले आणि ४ लसूण पाकळ्या, २ tbslp भाजलेल्या चण्याच्या डाळ्या, ३ हिरव्या मिरच्या, थोडी कोथिंबीर, ३/४ लहान फोड कैरी किंवा १ tblsp लिंबाचा रस, आणि चवीनुसार मीठ.
कृती 👉 तिन्ही डाळी ६ तास पाण्यात भिजवून घ्याव्यात. ६ तासानंतर मूठभर मुगाची डाळ बाजूला काढून बाकी तिन्ही डाळी मिक्सरला पाणी न घालता वाटून घ्याव्यात. वाटून झाल्यानंतर एका भांड्यात काढून घ्या आणि त्यात हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, बारीक चिरलेली कोथिंबीर, काडिपत्ते, धणे पावडर, हिंग, जीरे, चिरलेला कांदा, ठेचलेले आले लसूण, चवीनुसार मीठ घालून सर्व साहित्य एकजीव करा. आता चटणीसाठी मिक्सरमध्ये ओल्या नारळाचे काप, आले आणि लसूण पाकळ्या, भाजलेल्या चण्याच्या डाळ्या, हिरव्या मिरच्या, थोडी कोथिंबीर, कैरी किंवा १ tblsp लिंबाचा रस, आणि चवीनुसार मीठ घालावे. थोडे पाणी घालून बारीक वाटून चटणी तयार करावी. आता तळ हाताला पाणी लावून वाड्याचे मिश्रण थापून घ्या आणि एक एक करून गरम तेलात वडे तांबूस रंगावर तळून घ्या. गरमागरम डाळ वडे चटणी सोबत सर्व्ह करावे. धन्यवाद !
#dalvaderecipe #dalvada #maharashtriansnacks
If you liked the video, Please Like & Share.
.................................................................................................................
Follow Us On Instagram 👉 / gharcha_swaad
Follow Us On Facebook 👉 / gharcha.swaad
For Business & Sponsorship Enquiries 👉 gharcha.swaad@gmail.com