Перейти к содержимому

सुंदरवाडीची सुंदर भटकंती | सावंतवाडीतील खास ठिकाणं | शेतातला पळसाचा चहा

Mukta Narvekar

0:00 / 0:00

सुंदरवाडीची सुंदर भटकंती | सावंतवाडीतील खास ठिकाणं | शेतातला पळसाचा चहा

127 159 просмотров · 2 года назад
Mukta Narvekar
309 тыс. подписчиков
127 159 просмотров · 2 года назад
सर्वोदय इको होमस्टे - https://www.booking.com/Share-Ah3TTS5 +91 94200 81501 सावंतवाडी म्हणलं की डोळ्यासमोर येतात रंगीबेरंगी लाकडी खेळणी, गंजिफाचे वेधक रंग, मोती तलाव आणि राजवाड्याचा शांत परिसर. सावंतवाडी फिरताना या सगळ्या गोष्टींचा आनंद घेतलाच शिवाय मोती तलावापाठी असणाऱ्या हिरव्यागार नरेंद्र डोंगरावरही गेले. डोंगरावर जाऊन मस्त नेचर trail केली. पाऊण तासाची नागमोडी वाट. शिशिर ऋतूचा सोहळा अनुभवायला मिळाला तिथे. सकाळी हलकी हलकी थंडी होती. झाडं आपली पानं गाळून वृक्षकळा दाखवत होती. निसर्गशिल्प स्पष्ट दिसत होती. मचाणीवरून धुक्यात हरवलेली सावंतवाडी बघितली. खूप सुंदर अनुभव होता. अजून एक सुंदर अनुभव मी तिथे घेतला. मी सावंतवाडीत ज्या होमस्टे मध्ये राहिले होते, त्या होमस्टेचे host natural farming करतात. दुपार त्यांच्या शेतावरच घालवली. संध्याकाळी पळसाचा चहा केला. सूर्यास्त बघत चहा पिला आणि उकडलेली कणगी खाल्ली. मनाला आराम मिळाला तिथे. हा सगळा अनुभव एपिसोड मधून शेअर केला आहे. नक्की बघा. The music in this video is from Epidemic Sound https://www.epidemicsound.com/referra... Cinematography And Editing Rohit Patil And Sayali Mahajan Follow me on Insta   / mukta_narvekar   My fb page https://www.facebook.com/MuktaNarveka...