Barshi Police Action | दीड वर्षापासून फरार महिला आरोपी अखेर पोलिसांच्या ताब्यात | Barshi News
Khabar gavakdchi
0:00 / 0:00
Barshi Police Action | दीड वर्षापासून फरार महिला आरोपी अखेर पोलिसांच्या ताब्यात | Barshi News
127 387 просмотров · 1 мес. назад
Khabar gavakdchi
22,4 тыс. подписчиков
127 387 просмотров · 1 мес. назад
📢 खबर गावाकडची – गावची बातमी, गावासाठी बातमी
आपल्या खबर गावाकडची हे एक विश्वासार्ह डिजिटल न्यूज चॅनेल असून, गावपातळीवरील खऱ्या, थेट आणि निर्भीड बातम्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
या चॅनेलवर तुम्हाला मिळतील👇
🟢 ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद बातम्या
🟢 स्थानिक राजकारण व घडामोडी
🟢 सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यक्रम
🟢 शेतकरी प्रश्न, ग्रामीण समस्या
🟢 अपघात, गुन्हे, पोलिस कारवाई
🟢 यात्रा, उत्सव, कार्यक्रमांचे थेट कव्हरेज
🟢 सामान्य माणसाचा आवाज – गावाची खरी खबर
📍 गावातील प्रत्येक बातमी – सर्वात आधी तुमच्यापर्यंत
📍 राजकारण असो वा समाजकारण – निर्भीड मांडणी
📍 गावाकडची माती, गावाकडचा आवाज
👉 आमचे व्हिडिओ आवडल्यास Like 👍, Share 📲 आणि Subscribe 🔔 नक्की करा.
👉 तुमच्या गावातील बातमी, व्हिडिओ किंवा माहिती पाठवण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा. ९९२२६१९६८३
📢 आपल्या विश्वासावरच आमची ओळख…
📢 आपल्या गावाची – आपलीच खबर!
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@
🚨 बार्शी तालुका पोलिसांची धडाकेबाज कामगिरी!
चोरीच्या गुन्ह्यात तब्बल दीड वर्षापासून फरार असलेल्या महिला आरोपीला बार्शी तालुका पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बहुसिंगपुरा येथील डोंगराळ भागातून शिताफीने अटक केली आहे.
बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 177/25 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 305(अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. तक्रारदाराच्या बॅगेतून रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा एकूण 2 लाख 45 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीला गेल्याची तक्रार होती.
गुन्हा दाखल झाल्यापासून महिला आरोपी सुमारे 15 महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत होती. पोलिसांचा शोध चुकवण्यासाठी ती वारंवार मोबाईल क्रमांक आणि राहण्याची ठिकाणे बदलत होती. नृत्यकलेचे कार्यक्रम करून ती वेगवेगळ्या भागात फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी बहुसिंगपुरा येथील डोंगराळ परिसरात राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मात्र डोंगराळ भागामुळे आरोपीचे अचूक लोकेशन शोधणे आव्हानात्मक ठरत होते.
त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने शेतकरी आणि कामगारांचा वेश धारण करून सुमारे दीड दिवस परिसरात वावरत आरोपीच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले. योग्य संधी साधत पोलिसांनी महिला आरोपीला ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव राणी अरुण साळवे (भिवसने), वय 26 वर्षे, रा. बहुसिंगपुरा, जिल्हा छत्रपती संभाजीनगर असे आहे.
या गुन्ह्यातील चोरीचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम हस्तगत करण्याची कार्यवाही सुरू असून आरोपीला पोलीस कस्टडी रिमांडसाठी न्यायालयासमोर हजर करण्यात येत आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, महिला पोलीस उपनिरीक्षक सिंधुताई देशमुख, अमृत खेडकर, प्रदीप चौधरी, युवराज गायकवाड, ओमप्रकाश दासरे आणि सिद्धेश्वर लोंढे यांनी सहभाग घेतला.
📍 ठिकाण: बार्शी / बहुसिंगपुरा, छत्रपती संभाजीनगर
💰 चोरीचा मुद्देमाल: रोख रक्कम व सोन्याचे दागिने
💵 एकूण किंमत: 2 लाख 45 हजार रुपये
📋 गुन्हा रजिस्टर क्र.: 177/25
⚖️ कलम: भारतीय न्याय संहिता 305(अ)
━━━━━━━━━━━━━━━
🔔 अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी आमचे चॅनल Subscribe करा आणि Bell Icon दाबा.
👍 बातमी आवडल्यास Like करा
💬 तुमचे मत Comment मध्ये सांगा
📲 बातमी Share करा
━━━━━━━━━━━━━━━
#BarshiNews #BarshiPolice #Barshi #SolapurNews #SolapurPolice #CrimeNews #MaharashtraNews #PoliceAction #BreakingNews #CrimeNewsMarathi #MarathiNews #MaharashtraPolice #ChhatrapatiSambhajinagar #PoliceNews #NewsUpdate
Barshi News, Barshi Police, Barshi Crime News, Barshi Police News, Solapur News, Solapur Rural Police, Maharashtra Crime News, Marathi News, महिला आरोपी अटक, बार्शी पोलिस, बार्शी क्राईम न्यूज, चोरीचा गुन्हा, फरार महिला आरोपी, सोलापूर ग्रामीण पोलीस, बहुसिंगपुरा, छत्रपती संभाजीनगर न्यूज, Maharashtra Police, Crime News Marathi, Police Action