Перейти к содержимому

Horse Baggi /घाेडा बग्गी Best Horse /Horse/Horse Video/Horse riding

Pratap Mogal Shree Photo's

0:00 / 0:00

Horse Baggi /घाेडा बग्गी Best Horse /Horse/Horse Video/Horse riding

2 305 146 просмотров · 7 л. назад
Pratap Mogal Shree Photo's
282 тыс. подписчиков
2 305 146 просмотров · 7 л. назад
Horse Baggi /घाेडा बग्गी Best Horse /Horse/Horse Video/Horse riding घाेडा... यस्याश्वास्तम राज्यं ! यस्याश्वास्तस्य मेदिनी ! यस्याश्वास्तस्य साैख्यं ! यस्याश्वास्तस्य साम्राज्यं ! पुराण काळापासुनंच घाेडा ह्या प्राण्याला महत्व आहे.त्यासाठी अगदी रामायणाचाही संदर्भ देता येईल.प्रभु रामचंद्रांनी केलेला अश्वमेध यज्ञ आणि त्यांचा अश्व अडवलेले लव कुश आपल्याला माहीत आहेत.त्यानंतर पुढील काळात ह्या प्राण्याने आपली प्रतिष्ठा जपत मानवाच्या आयुष्यातील गतीची जागा घेतली आणी प्रवासाचा ताे सख्खा साेबती बनला.महाराणा प्रताप यांचा घाेडा चेतक आणि हल्दी घाटी च्या लढाईत असंख्य वारांनी घायाळ हाेऊनही महाराणा प्रतापांना सुरक्षीत स्थळी साेडून मग प्राण त्यागणारा चेतक इतिहासाला ज्ञात आहे.पुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात हा दर्या खाेर्यांचा महाराष्ट्रंच काय तर थेट आग्र्यापर्यंत ह्या घाेड्यांनी आपल्या टापा उधळल्या, शिवरायांना आग्र्यातुन वेगाने महाराष्ट्रात आणण्याचे काम ह्याच प्राण्याने केले.ह्या अतुल्य पराक्रमाबाबत कवी राजा बढे म्हणतात "भीमथडीच्या तट्टांनाया यमुनेचे पाणी पाजा , जय महाराष्ट्र माझा" थाेरल्या बाजीरावांनी तर आपल्या सैन्यात अमुलाग्र बदल घडवून आणून घाेडदळाला दिलेले महत्व. आणि त्याचा परीपाक म्हणून दिल्लीचेही तख्त राखीताे महाराष्ट्र माझा असे गाैरवाेद्गार हे वेगाने कूच करणार्या घाेडदळालाच जाते. काळ बदलला वेगवान संदेशवहन , दळणवळणासाठी घाेडा हा उपयुक्त आहे हे लक्षात घेऊन त्याचे संगाेपन सुरुच राहीले.विविध माध्यमातून घाेड्यांचा वापर हाेत राहीला.मग घाेडागाडी आली.इंग्रज साहेब बग्गीतुन फीरु लागला.मुळातंच रुबाब धारण केलेल्या प्राण्याच्या प्रती श्रीमंती चिकटली ती कायमचीच.नंतर नंतर वेगवान गाड्या आल्या घाेड्यांच्या पागा ह्या आेस पडू लागल्या बग्गी गेली आणि मग त्याचा रुबाब कमी हाेत हाेत आधी टांगा नंतर शर्यतीपुरता ( बैल आणि घाेड्यांच्या शर्यती ) पण त्याच्यावरही कायद्याचा बडगा उचलला गेला , आणि घाेडे असण्याचे सांभाळण्याचे प्रमाण झपाट्याने कमी झाले.नंतर मग नवरदेवापुरता , बगीचातून लहान मुलांना चक्कर मारण्यापुरता त्याचा प्रवास येऊन थांबला. आणि घाेडा हा प्राणी पाेसणे म्हणजे पांढरा हत्ती पाेसणे असेच समीकरण हाेऊन बसले.पण तरीही ह्या प्राण्याविषयीचे प्रेम जनसामान्यात कमी झालेले नाही.आजही ज्यांच्याकडे घाेडा आहे त्यांच्यासाठी ते भुषण आहे.कारण घाेडा सांभाळणे हे दिसते तेवढे साेपे काम नाही.तरीही तुरळक शेतकर्यांकडे अजुन घाेडा आहे.आणि ते त्याचा व्यवस्थीत सांभाळ करतात. घाेड्यांच्या असंख्य जाती आहेत भारतात सींधी , मारवाडी , काठेवाडी , पंजाबी , भीमथडी , पहाडी घाेड्यांचे प्रकार प्रचलीत आहेत.त्यातही अरबी घाेडे सगळ्यात जास्त प्रचलीत आहेत.अरबी जातीवंत घाेडा हा १०० मैल न थकता सलग पळू शकताे असे म्हणतात.सारंगखेडा ( जी.नंदुरबार ) इथला घाेड्यांचा बाजार प्रसिद्ध आहे.घाेड्यांना हिरवा चारा , भिजवलेले हरभरे फार आवडतात.शिजलेले अन्न घाेड्यांना खायला दिल्यास त्यांना पाेटाचे विकार हाेतात.घाेड्यांच्या पायाला लाेखंडी नाल ठाेकतात त्यामुळे त्यांचे खडकाळ भागातुन पळतांना रक्षण हाेते.घाेडा हा झाेपत नाही , किंवा जमीनीवर बसत नाही हा गैरसमज समाजात आहे.पण त्यांच्या अनुकूल आजुबाजूची जागा असेल तर घाेडे जमीनीवर बसतात.आणि कुणाचीही चाहूल लागली तरी लगेच उठून उभे राहतात.त्यामुळे घाेडा बसलेला पाहण्याचा याेग दुर्मीळंच आहे.घाेडा कधीही ताेंडाने श्वास घेऊ शकत नाही, त्यामुळे त्यांना धाप लागलेली कधीही पहायला मिळत नाही. #horsebaggi #बळीराजाचीलेकरं #pratapmogal #ЛошадьВидео #caballo