गुरूच्या नावाचा पुरस्कार कृतार्थभावाने स्वीकारणारे पद्मश्री डॉ. डी.वाय. पाटील यांचे एक दुर्मिळ भाषण
Shiv Varta
0:00 / 0:00
गुरूच्या नावाचा पुरस्कार कृतार्थभावाने स्वीकारणारे पद्मश्री डॉ. डी.वाय. पाटील यांचे एक दुर्मिळ भाषण
3 706 просмотров · 1 месяц назад
Shiv Varta
6,91 тыс. подписчиков
3 706 просмотров · 1 месяц назад
“गुरूकडून शिष्याचा सन्मान”
दि. १३ एप्रिल २०२२ रोजी पद्मश्री डॉ. डी.वाय. पाटील यांना शिवाजी विद्यापीठाचा प्राचार्य रा.कृ. कणबरकर पुरस्कार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला होता. यावेळी तत्कालीन कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, शांतादेवी डी. पाटील आणि प्राचार्य डॉ. बाबासाहेब खोत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी डॉ. डी.वाय. पाटील यांनी म्हटले होते की, प्राचार्य कणबरकर सर हे माझे गुरू आहेत. गुरूंच्या नावे असणारा पुरस्कार मला मिळाला, यामुळे उपकृततेची भावना मनी दाटली आहे. त्यामुळेच अन्य पुरस्कारांपेक्षा हा पुरस्कार माझ्यासाठी खूप वेगळा आणि जवळचा आहे. पूर्वी गुरूदक्षिणा दिली जायची, पण आज गुरूकडून शिष्याचा सन्मान झाला आहे, हे या पुरस्काराचे वेगळेपण आहे, अशी भावना व्यक्त केली होती.
तसेच, डॉ. डी.वाय. पाटील यांनी पुरस्काराच्या १ लाख ५१ हजार रुपयांच्या रकमेत आणखी १० लाख रुपयांची भर घालून तो निधी विद्यापीठाकडे सुपूर्द करण्याची घोषणा केली. या निधीमधून संतसाहित्याच्या क्षेत्रात प्रभावी काम करणाऱ्या व्यक्तींसाठी पुरस्कार योजना निर्माण करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. डॉ. पाटील यांच्या हस्तेच सदर ११ लाख ५१ रुपये इतक्या निधीचा धनादेश कुलगुरू डॉ. शिर्के यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला होता. त्यामधून सदर पुरस्कार योजना डॉ. डी. वाय. पाटील यांच्याच नावे विद्यापीठाने कार्यान्वित केली आहे.
आयुष्याच्या अखेरच्या कालखंडात डॉ. डी.वाय. पाटील यांनी केलेले हे एक दुर्मिळ भाषण...