मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पाला गती; पहिल्या टप्प्यासाठी २० हजार कोटींच्या कर्जसहाय्याची शक्यता
DD Sahyadri News
0:00 / 0:00
मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पाला गती; पहिल्या टप्प्यासाठी २० हजार कोटींच्या कर्जसहाय्याची शक्यता
782 просмотра · 1 дн. назад
DD Sahyadri News
1,5 млн подписчиков
782 просмотра · 1 дн. назад
मराठवाड्यातील पाणीटंचाई दूर करण्याच्या दृष्टीनं महत्त्वाच्या मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पाला गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. प्रकल्पाचा प्राथमिक अहवाल तातडीनं सादर करून केंद्र सरकारच्या आर्थिक व्यवहार विभागाकडे पाठवण्याची प्रक्रिया वेगानं पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. मुंबईतील वर्षा निवासस्थानी जपानच्या आंतरराष्ट्रीय सहकार्य संस्थेच्या (जायका) वरिष्ठ शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठकीत याबाबत चर्चा झाली. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी जायकाकडून सुमारे २० हजार कोटी रुपयांचं कर्जसहाय्य मिळण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.
अतिरिक्त पाणीसाठा असलेल्या धरणांमधून दुष्काळी भागातील धरणांपर्यंत बंदिस्त जलवाहिन्यांद्वारे पाणी पोहोचवणं हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. पहिल्या टप्प्यात छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर आणि धाराशिव या चार जिल्ह्यांचा समावेश असून जायकवाडी, माजलगाव, मांजरा, उजनी, निम्न तेरणा आणि निम्न मनार ही सहा धरणं परस्परांना जोडली जाणार आहेत.
#MarathwadaWaterGrid #DevendraFadnavis #JICA #WaterManagement #WaterSecurity #Marathwada #Maharashtra #DDSahyadriNews #MarathiNews