Pravachan 2 of 3 - Shri Swami Swaroopanand, Pawas
Pawasche Swami
0:00 / 0:00
Pravachan 2 of 3 - Shri Swami Swaroopanand, Pawas
19 189 просмотров · 10 л. назад
Pawasche Swami
895 подписчиков
19 189 просмотров · 10 л. назад
आज श्रावण कृष्ण द्वादशी (29th August, 2016) श्री स्वामी स्वरूपानंदांची (सकाळी ८:४० वाजता) पुण्यतिथी! स्वामीजींच्या स्मरणार्थ, त्यांच्या दुसऱ्या प्रवचनाचा हा व्हिडिओ साधकांसाठी YouTube वर उपलब्ध करून देत आहोत.
ह्या प्रवचनाच्या निर्मितीबाबत श्री. श्रीकांत (बाबु) देसाई ह्यांनी लिहिलेल्या आठवणी:
श्रीस्वामी स्वरूपानंद , पावस . अतीशय नाजूक प्रकृती असल्यामुळे , आवाजही हळुवारच होता , त्यातही १९६१-६२ मध्ये आवाज अजूनच हळू येऊ लागला .
असाच जर आवाज कमी होत गेला तर आपल्याजवळ श्रीस्वामींच्या आवाजातील त्याची शिकवण असावी म्हणून स्वामींचे एक शिष्य श्री देवळेकर यांनी टेप रेकाॅर्डर आणला रेकाॅर्डिस्ट नेमला गेला, पण त्यांना फक्त रविवारीच वेळ मिळत असे .
स्वामींची प्रकृती इतकी नाजुक होती कीं एका वेळी जास्तीत जास्त एक ते दीड मिनीटच बोलतां येत असे. नंतर श्रमामुळे अर्धा तास ते एक तास झोपून विश्रांती घ्यावी लागे . आणी त्यातच कोणी दर्शनास आले की अजून वेळ जात असे . रेकाॅर्डिस्ट ५ वाजता परत जायचे . असे एका रविवारी फक्त ३-४ मिनिटेच रेकाॅरडिंग होत असे .
ही तीन प्रवचने जवळजवळ १५ ते २० रविवार आणी ५० ते ६० सिटींग्ज मध्ये झाली आहेत . गंमत अशी कीं पूर्वी प्रवचन कोठपर्यंत झाले हे कधीही पहावे लागले नाही , पहिल्या वाक्याच्या पुढे श्रीस्वामी बोलावयास सुरवात करीत. आपल्याला ते अगदी एका वेळी केल्यासारखे वाटते पण वस्तुस्थिती अशी आहे.
ह्या YouTube व्हिडिओ मध्ये स्वामींचे प्रवचन ऐकताना, त्याचे शब्दही वाचता येतात.
Published on August 29, 2016 at 8:40 am
A rare recording of Swami Swaroopanand (Pawas, Ratnagiri, Maharashtra, India). This one is the second lecture of the only three lectures ever recorded of Swamiji.
For more, please see a Facebook page "Pawasche Swami Swaroopanand"