Перейти к содержимому

बिना दाळ-तांदूळ भिजवता फक्त १० मिनिटांत बनवा नवीन इंस्टंट सँडविच ढोकळा | Chutney Sandwich dhokla

Deepa’s Kitchen Marathi

0:00 / 0:00

बिना दाळ-तांदूळ भिजवता फक्त १० मिनिटांत बनवा नवीन इंस्टंट सँडविच ढोकळा | Chutney Sandwich dhokla

27 просмотров · 15 часов назад
Deepa’s Kitchen Marathi
7,26 тыс. подписчиков
27 просмотров · 15 часов назад
सँडविच ढोकळा ही अतिशय सोपी, झटपट आणि चविष्ट रेसिपी आहे. आज आपण दाळ-तांदूळ न भिजवता फक्त रव्यापासून झटपट सँडविच ढोकळा बनवणार आहोत. हा ढोकळा अगदी मऊ, लुसलुशीत होतो आणि मध्ये हिरवी चटणीची स्वादिष्ट लेअर असल्यामुळे दिसायलाही खूप सुंदर दिसतो. नाश्त्यासाठी, संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी किंवा पार्टी स्टार्टर म्हणून ही रेसिपी नक्की करून पाहा. कमी वेळात तयार होणारा हा इंस्टंट रवा सँडविच ढोकळा घरातील सगळ्यांना नक्की आवडेल. साहित्य: ढोकळ्यासाठी: १ कप रवा अंदाजे १ कप पाणी चवीनुसार मीठ १ टीस्पून इनो १½ टेबलस्पून तेल फोडणीसाठी: १ टीस्पून मोहरी १ टीस्पून तीळ चिमूटभर हिंग १ टीस्पून जिरे कढीपत्ता २ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेली कोथिंबीर हिरव्या चटणीसाठी: १½ कप कोथिंबीर ४–५ तिखट हिरव्या मिरच्या १ इंच आल्याचा तुकडा १ टीस्पून मीठ आवश्यकतेनुसार थोडे पाणी कृती: एका भांड्यात रवा, दही, मीठ, साखर आणि पाणी घेऊन चांगले एकजीव करून घ्या. मिश्रण जास्त घट्ट किंवा पातळ न ठेवता ढोकळ्यासाठी योग्यसर मध्यम घट्टसर बॅटर तयार करा. बॅटर काही मिनिटे बाजूला ठेवून रवा व्यवस्थित फुलू द्या. दरम्यान हिरवी चटणी तयार करण्यासाठी कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, आले, भाजलेली शेंगदाण्याची डाळ, लिंबाचा रस, मीठ आणि साखर मिक्सरमध्ये घ्या. आवश्यकतेनुसार थोडे पाणी घालून बारीक हिरवी चटणी वाटून घ्या. तयार बॅटरमध्ये शेवटी इनो फ्रूट सॉल्ट घालून हलक्या हाताने एकाच दिशेने मिसळा. ताटाला किंवा ट्रेला थोडे तेल लावून त्यात बॅटरचा पातळ थर पसरवा. ट्रे हलकेच टॅप करून वाफवण्यासाठी ठेवा. साधारण ५–७ मिनिटे वाफवून पहिला थर सेट करून घ्या. गॅस बंद करून त्यावर तयार केलेली हिरवी चटणी पसरवा. चटणीवर बॅटरचा पुढचा थर अलगद पसरवा. पुन्हा ५–७ मिनिटे वाफवून घ्या. शेवटी उरलेले पांढरे बॅटर वरून पसरवा आणि वरून थोडी काळी मिरी किंवा आवडीनुसार मसाला भुरभुरवा. पुन्हा साधारण ५–६ मिनिटे वाफवून घ्या. टूथपिक किंवा सुरीने तपासा. ती स्वच्छ बाहेर आली तर ढोकळा व्यवस्थित शिजला आहे. ढोकळा थोडा थंड होऊ द्या आणि सुरीने कडा सोडवून घ्या. ढोकळा प्लेटमध्ये उलटा करून काढा आणि बटर पेपर असल्यास तो अलगद काढून टाका. फोडणीसाठी कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, तीळ, जिरे, हिंग, कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्या घाला. फोडणी तयार झाल्यावर ती ढोकळ्यावर सर्वत्र घाला. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. ढोकळ्याचे चौकोनी तुकडे कापा आणि तयार आहे मऊ, लुसलुशीत आणि चटपटीत रवा सँडविच ढोकळा #रवासँडविचढोकळा #सँडविचढोकळा #इंस्टंटढोकळा #रवादोकळा #ढोकळा #झटपटरेसिपी #नाश्त्याचारेसिपी #मराठीरेसिपी #महाराष्ट्रीयनरेसिपी #Dhokla #RavaDhokla #SandwichDhokla #InstantDhokla #RavaSandwichDhokla #deepaskitchen #deepa #saritaskitchen #madhurasrecipe For Collaboration Contact deepamhalunkar31@gmail.com DeepasKitchenMarathi