भाषेतली श्लील-अश्लीलता कोण ठरवतं? | समज-गैरसमज । डॉ. प्रज्ञा दया पवार
BBC News Marathi
0:00 / 0:00
भाषेतली श्लील-अश्लीलता कोण ठरवतं? | समज-गैरसमज । डॉ. प्रज्ञा दया पवार
12 879 просмотров · 10 часов назад
BBC News Marathi
3,49 млн подписчиков
12 879 просмотров · 10 часов назад
भाषेतली श्लील-अश्लीलता कोण ठरवतं? एखादा शब्द अश्लील असतो, की त्याचा संदर्भ, हेतू, वापर आणि सामाजिक अर्थ त्याला अश्लील बनवतो?
‘समज-गैरसमज’च्या या एपिसोडमध्ये ज्येष्ठ लेखिका आणि कवयित्री डॉ. प्रज्ञा दया पवार भाषेतील श्लीलता-अश्लीलता, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सामाजिक वास्तव यांचा वेध घेत आहेत.
अश्लीलतेची व्याख्या काळानुसार आणि समाजानुसार बदलते का? इंग्रजीतील slang ‘cool’ वाटतो, पण मराठीतला तसाच शब्द अश्लील का वाटतो? सार्वजनिक आणि खासगी अवकाशात भाषेचे निकष वेगळे असतात का? आणि ‘फ्रीडम ऑफ स्पीच’च्या नावाखाली कोणत्याही प्रकारची भाषा योग्य ठरू शकते का? या तरुणांच्या प्रश्नांना त्यांनी उत्तरं दिली आहेत.
या सविस्तर चर्चेत 1860 मधील ब्रिटिशकालीन कायद्यापासून 2014 मधल्या कोर्टाच्या निकालापर्यंत अश्लीलतेच्या बदललेल्या कायदेशीर व्याख्यांचा आढावा घेतला आहे. हिकलिन टेस्ट, रघुनाथ धोंडो कर्वे यांच्या ‘समाज स्वास्थ्य’ मासिकावरील खटला आणि त्या प्रकरणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडलेली भूमिका यावरही चर्चा केली आहे.
नामदेव ढसाळ, उर्मिला पवार, इस्मत चुगताई, विजय तेंडुलकर यांच्यासारख्या लेखकांच्या साहित्याचा दाखला देत, वंचित आणि शोषित समूहांनी प्रस्थापित भाषेच्या चौकटी मोडून भाषा ही प्रतिकार आणि संघर्षाचं साधन कशी बनवली, याबद्दलही प्रज्ञा दया पवारांनी मांडणी केली आहे.
सोशल मीडिया, Gen-Z slang, protest slogans, body shaming, casteist remarks आणि सार्वजनिक भाषेच्या मर्यादा यावरही तरुणांच्या प्रश्नांतून चर्चा होते. एखाद्याचा अपमान करणारी भाषा आणि व्यवस्थेविरोधातला विद्रोही भाषिक आविष्कार यांच्यात फरक कसा करायचा?
अश्लीलता फक्त लैंगिक भाषेशी संबंधित आहे का? हिंसा, जातीय भेदभाव, स्त्रीद्वेष आणि माणसाचा अपमान हेसुद्धा अश्लीलतेचाच भाग आहेत का? अशा प्रश्नांची उत्तरं ‘समज-गैरसमज’मध्ये जाणून घेऊया.
#historyoflanguage #marathi #विद्रोही #SamajGairsamaj #genz
बीबीसी न्यूज मराठीचं YOUTUBE CHANNEL SUBSCRIBE करा 👉🏽 https://bbc.in/4pSJRwe
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...
पाहा सविस्तर गोष्टी आणि बातम्या आमच्या वेबसाईट आणि सोशल हँडल्सवर :
https://www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi