Shraddha Vaze | ‘आपली कला लोकांपर्यंत चांगल्या प्रकारे पोहचल्याचा आनंद अवर्णनीय' | Nave Shahar
Nave Shahar
0:00 / 0:00
Shraddha Vaze | ‘आपली कला लोकांपर्यंत चांगल्या प्रकारे पोहचल्याचा आनंद अवर्णनीय' | Nave Shahar
708 просмотров · 1 год назад
Nave Shahar
2,93 тыс. подписчиков
708 просмотров · 1 год назад
‘काव्य रसिक मंडळ, डोंबिवली' आयोजित ‘अमृता प्रितम जन्मशताब्दि' निमित्त दहा मिनिटांसाठी केलेले वक्तृत्व लोकांच्या पसंतीस उतरल्याने मग त्यावर पूर्ण लांबीचा कार्यक्रम करण्याची विचार पुढे आला. आता त्या अभिवाचनाचे ६० हुन अधिक प्रयोग होऊन अमृत महोत्सवाकडे वाटचाल सुरु असल्याचे वृत्तनिवेदिका-अभिवाचक सौ.श्रध्दा वझे यांनी ‘नवे शहर'ला दिलेल्या मुलाखतीत नमूद केले. आवाजासाठी रोजच्या रोज व्यायाम असतात व त्यामुळे तो आणखी चांगला बनत जात असल्याचा अनुभव आल्याची माहितीही त्यांनी मुलाखतीतून दिली.
महिलांनी, मुलींनी सातत्याने स्वतःचा शोध घ्यायची भूमिका अंगिकारली पाहिजे. यामुळे आपल्यातील कलावंत शोधण्यासाठी मदत होते आणि आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर स्वतःला सिध्द केल्यास आयुष्य नव्यानेच सुरु झाल्याचा आनंद मोठा असतो असे सांगत पडद्यामागे असणाऱ्या आमच्यासारख्या कलावंतास ‘नवे शहर'ने पडद्यावर आणल्याबद्दल वृत्तनिवेदिका-अभिवाचक सौ. श्रध्दा वझे यांनी धन्यवाद दिले.