अंधश्रद्धेचे दुनिया चमत्काराची किमया l अनिस
Godgift Media
0:00 / 0:00
अंधश्रद्धेचे दुनिया चमत्काराची किमया l अनिस
73 просмотра · 1 день назад
Godgift Media
11,4 тыс. подписчиков
73 просмотра · 1 день назад
अंधश्रद्धेचे दुनिया चमत्काराची किमया l अनिस
21 सप्टेंबर 1995 साली गणपतीने दुग्धप्राशन केल्याची घटना त्यानिमित्त चमत्कार सत्यशोधन दिन कृतिशील प्रबोधनाने साजरा.
पाडेगाव तालुका खंडाळा जिल्हा सातारा येथील भैरवनाथ तरुण गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या आगळ्यावेगळ्या मनोरंजनातून विज्ञान आणि चमत्कार सादरीकरणाच्या कार्यक्रमातून *सत्यशोधन दिन*साजरा केला.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीतील कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते प्रशांत पोतदार यांनी विविध चमत्कारांच्या प्रात्यक्षिकांसह सखोल मार्गदर्शन केले. जिवंत कोंबडीला संमोहित करून केवळ पाण्याच्या सहाय्याने दिवा प्रज्वलित करणे, लोखंडी लंगर मंत्राच्या साह्याने सोडवणे नजरेच्या साह्याने नारळाची कवटी थांबवणे, नारळातून करणी काढणे, मंत्राच्या साह्याने नारळ पेटवणे , जनता पलीता अंगावरून फिरवणे, 2000 टोकदार खेळांच्या पाटावर चालणे -झोपणे इत्यादी चमत्कारांमागील रहस्य सांगून त्यांचा भांडाफोड केला. भूत भानामती करणी मूठ विज्ञान सांगते सारे झूट या घोषणांनी विवेकाचा आवाज बुलंद केला. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांनी अशा भोंदूगिरीच्या व अघोरी प्रथांच्या विरोधात जादूटोणा विरोधी कायदा होण्यासाठी केलेला संघर्ष उलगडला. या कायद्याचे कृतिशील अंमलबजावणी करण्याची जबाबदारी तरुणांची आहे. यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोनाने चिकित्सक वृत्ती सर्वांनी बाळगली पाहिजे असे प्रतिपादन केले. यामध्ये दशरथ रणदिवे, राजेश पुराणिक, वीर पोतदार यांनी कृतिशील सहभाग घेतला.
कार्यक्रमाचे आयोजनसाठी भैरवनाथ तरुण मंडळ पाडेगावचे अध्यक्ष किरण दीपक माने उपाध्यक्ष स्वप्निल विजय धायगुडे खजिनदार अजित गणपत माने व कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली
व प्रात्यक्षिकामध्ये प्रत्यक्ष सहभाग अजित नानासो माने, मंडळाचे उपाध्यक्ष स्वप्निल विजय धायगुडे, सौ वर्षाताई भारत माने, सौ नंदाताई दीपक माने व बाल कार्यकर्ते शिवराज अंकुश माने, आर्यन सुनील माने, सर्वज्ञ संतोष मर्दाने श्री व सौ मिसाळ तसेच बालमित्रांनी व मोठ्या संख्येने स्त्री-पुरुष नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
शेवटी या कार्यक्रमाबद्दल माजी सरपंच श्री हरिश्चंद्र बबन माने , श्री रमेश भिवा धायगुडे यांनी आभार मानले.
21 sep.2026
चमत्कार सत्यशोधन दिन.