Перейти к содержимому

हरिपाठ : 30 मिनिटांचा संपूर्ण हरिपाठ | 30 Min Sampurna Haripath #Haripath #Lyrics #marathi

Haripath Marathi Bhakti

0:00 / 0:00

हरिपाठ : 30 मिनिटांचा संपूर्ण हरिपाठ | 30 Min Sampurna Haripath #Haripath #Lyrics #marathi

188 202 просмотра · 1 месяц назад
Haripath Marathi Bhakti
4,41 тыс. подписчиков
188 202 просмотра · 1 месяц назад
Track : - Haripath Singer : Sachin Maharaj Mane Pakhawaj : Omkar Chikne Composer : - Deepak Mharte Lyrics : Dnyaneshwar Maharaj Music Company : MPD Media Company #Haripath #Lyrics #haripath #marathi ॥ जय जय राम कृष्ण हरि ॥ (1) सुंदर ते ध्यान उभा विटेवरी । कर कटेवरी ठेवोनिया ॥1॥ तुळसीहार गळा कासे पीतांबर ।आवडे निरंतर हेची ध्यान ॥2॥ मकर कुंडले तळपती श्रवणी । कंठी कौस्तुभमणी विराजीत ॥3॥ तुका म्हणे माझे हेची सर्व सुख । पाहिन श्रीमुख आवडेनी ॥ (2) देवाचिये द्वारि उभा क्षणभरी । तेणे मुक्ती चारि साधिलेल्या॥1॥ हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा । पुण्याची गणना कोणकरी॥2॥ असोनी संसारी जीव्हा वेगु करी । वेदशास्त्र उभारी बाह्य सदा॥3॥ ज्ञानदेव म्हणे व्यासाचिया खुणा । द्वारकेचा राणा पांडवा घरी॥4॥ (3) चहु वेदी जाण षट्शास्त्री कारण । अठराही पुराण हरिसीगाती॥1॥ मथुंनी नवनीता तैसे घे अनंता । वाया व्यर्थ कथा सांडीमार्ग॥2॥ एक हरि आत्मा जीवशिव सम । न घाली मन॥3॥ ज्ञानदेवा पाठ हरि हा वैकुंठ । भरला घनदाट हरि दिसे॥4॥ (4) त्रिगुण असार निर्गुण हे सार । सारासार विचार हरिपाठ ॥1॥ सगुण निर्गुण गुणांचे अगुण । हरिवीण मन व्यर्थ जाय ॥2॥ अव्यक्त निराकार नाही ज्या आकार । जेथुनी चराचर हरिसी भजे॥3॥ ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी । अनंत जन्मोनी पुण्य होय॥4॥ (5) भावेविण भक्ती भक्तीवीण मुक्ती । बळेवीण शक्ती बोलु नये ॥1॥ कैसेनि दैवत प्रसन्न त्वरित । उगा राहे निवांत शिणसीवाया॥2॥ सायासे करिसी प्रपंच दिननिशी । हरिसी न भजसी कवण्यागुणे॥3॥ ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे । तटेल धरणे प्रपंचाचे ॥4॥ (6) योगयागविधी येणे नोहे सिध्दी । वायाची उपाधि दंभ धर्म ।।1।। भावेविण दैवत नकळे नि:संदेह । गुरुविण अनुभव कैसा कळे ।।2।। तपेविण दैवत दिधल्याविण प्राप्त । गुजेविण हित कोण सांगे ।।3।। ज्ञानदेव सांगे दृष्टांरताची मात । साधुचे संगती तरणोपाय ।।4।। (7) साधुबोध झाला तो नुरोनिया ठेला । ठायीच मुराला अनुभव ।।1।। कापुराच्या वाती उजळल्या ज्योति । ठाचीय समाप्ती झाली जैसी ।।2।। मोक्षरेख आला भाग्ये विनटला । साधुचा अंकीला हरिभक्त ।।3।। ज्ञानदेवा गोडी संगती सज्जेनी । हरि दिसे जनी वनी आत्मतत्वी ।।4।। (8) पर्वताप्रमाणे पातक करणे । वज्रलेप होणे अभक्तांसी ।।1।। नाही ज्यासी भक्ति ते पतीत अभक्तं । हरिसी न भजत दैवहत ।।2।। अनंत वाचाळ बरळती बरळ । त्या कैचा दयाळ पावे हरी ।।3।। ज्ञानदेवा प्रमाणे आत्मात हा निधान । सर्वांघटी पूर्ण एकनांदे ।।4।। (9) संताचे संगती मनोमार्ग गती । आकळावा श्रीपती येणे पंथे ।।1।। रामकृष्णं वाचा भाव हा जीवाचा । आत्मा तो शिवाचा रामजप ।।2।। एक तत्वण नाम साधिती साधन । द्वेताचे बंधन न बाधिजे ।।3।। नामामृत गोडी वैष्णसवा लाधली । योगिया साधली जीवनकळा ।।4।। सत्वर उच्चा्र प्रल्हादी बिंबला । उध्द।वा लाधला कृष्ण जाता जाता ।।5।। ज्ञानदेव म्हवणे नाम हे सुलभ । सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे ।।6।। (10) विष्णुविण जप व्यर्थ त्या्चे ज्ञान । रामकृष्णी मन नाही ज्याचे ।।1।। उपजोनी करंटा नेणे अद्वेत वाटा ।रामकृष्णी पैठा कैसा होय ।।2।। द्वैताची झाडणी गुरुविण ज्ञान । तया कैसे किर्तन घडेल नामी ।।3।। ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान । नामपाठ मौन प्रपंचाचे ।।4।। ।। रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी ।। (11) त्रिवेणी संगमी नाना तिर्थे भ्रमी । चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ ।।1।। नामासी विन्मुणख तो नर पापीया । हरीविण धावया न पावे कोणी ।।2।। पुराण प्रसिध्दी बोलीले वाल्मीके । नामे तीन्ही लोक उध्दरती ।।3।। ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे । परंपरा त्याचे कुळ शुध्द ।।4।। (12) हरिउच्चारीणी अनंत पापराशी । जातील लयाशी क्षणमात्रे ।।1।। तृण अग्नीचमेळे समजरस झाले । तैसे नामे केले जपता हरी ।।2।। हरी उच्चाचरण मंत्र पै अगाध । पळे भूत बाधा भेणे तेथे ।।3।। ज्ञानदेव म्हणे हरि माझा समर्थ । न करवे अर्थ उपनिषदा ।।4।। (13) तिर्थव्रत नेम भावेवीण सिध्दी । वायाची उपाधी करीसी जना ।।1।। भावबळे आकळे एरवी नाकळे । करतळी आवळे तैसा हरि ।।2।। पारियाचा रवा घेता भूमीवरी । यज्ञ परोपरी साधन तैसे ।।3।। ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण । दिधले संपूर्ण माझे हाती ।।4।। (14) समाधी हरीची समसुखेवीण । न साधेल जाण द्वेतबुध्दी ।।1।। बुध्दीचे वैभव अन्य नाही दुजे । एका केशवराजे सकळ सिध्दी ।।2।। ऋध्दी सिध्दी निधी अवघीच उपाधी । जव त्या परमानंदी मन नाही ।।3।। ज्ञानदेवी रम्य रमले समाधान । हरीचे चिंतन सर्वकाळ ।।4।। (15) Haripath, Saint Dnyaneshwar, Varkari, Warkari, Sampurna Haripath, Sampoorna Haripath, Mauli, Dnyaneshwar Maharaj, Mauli Bhajans, Mauli Abhangas, Vitthal Abhangs, Vitthal Bhajans, Pandurang Bhajans, Haripath Full, Haripath Audio, संपूर्ण हरिपाठ, हरिपाठ, Sampurna Haripath, Hari Mukhe Mhana, हरीपाठ, Haripat, Haripath in Marathi, @Marathi_Haripath 🌸 हरिपाठ | संपूर्ण हरिपाठ | संत परंपरेतील भक्तिमार्ग 🌸 संत ज्ञानेश्वर महाराज, संत एकनाथ महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या अभंग वचनातून उगम पावलेला हरिपाठ हा भक्ति परंपरेचा एक अत्यंत पवित्र ग्रंथ आहे. दररोज हरिपाठ पठण केल्याने मनाला शांती मिळते, घरात सुख-समृद्धी वाढते आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा प्रकट होते. ✨ हरिपाठ पठणाचे लाभ: मानसिक शांती आणि एकाग्रता घर-परिवारात सुख, शांती आणि समाधान अध्यात्मिक उन्नती आणि भक्तिभाव वाढ संकटे व विघ्नांचा नाश विठ्ठल-रुक्मिणीची कृपा प्राप्त 🙏 या व्हिडिओमध्ये आपणास संपूर्ण मराठी हरिपाठ भक्तिभावाने ऐकायला मिळेल. जय हरी विठ्ठल! 🌸 #हरिपाठ #संपूर्णहरिपाठ #MarathiHaripat #Haripat #SantDnyaneshwar #SantEknath #SantTukaram #MarathiBhakti #BhaktiGeet #VitthalBhajan #HariVitthal #VitthalRukmini #Bhajan #DevotionalSongs #SpiritualSongs #BhaktiSangeet #MPDBhakti #SantParampara #SanatanBhakti