जेव्हा अर्जुनाने श्रीकृष्णाला विचारला त्यांचा जन्म रहस्य!अध्याय ४ श्लोक ४-५ लिखित हिंदी अर्थ सहित
Pooja Garje
0:00 / 0:00
जेव्हा अर्जुनाने श्रीकृष्णाला विचारला त्यांचा जन्म रहस्य!अध्याय ४ श्लोक ४-५ लिखित हिंदी अर्थ सहित
95 просмотров · 3 месяца назад
Pooja Garje
23,7 тыс. подписчиков
95 просмотров · 3 месяца назад
टीप :- मेरे हिंदी subscribers के लिये लिखित हिंदी अर्थ सहित हैं..व्हिडीओ जरूर देखणा
🚩 जय श्री कृष्ण 🚩
आजच्या या व्हिडिओमध्ये आपण श्रीमद्भगवद्गीतेच्या चौथ्या अध्यायातील (ज्ञानकर्मसंन्यासयोग) अतिशय महत्त्वाचे आणि रहस्यमय असे श्लोक ४ आणि ५ सविस्तर मराठी अर्थासह समजून घेणार आहोत.
या श्लोकांमध्ये अर्जुनाला पडलेला एक अत्यंत स्वाभाविक प्रश्न आणि त्यावर भगवान श्रीकृष्णांनी दिलेले अत्यंत गूढ व सुंदर उत्तर यांचे वर्णन आहे.
📖 श्लोक आणि त्याचा अर्थ (Shlok & Meaning):
अध्याय ४, श्लोक ४ (अर्जुन उवाच):
अपरं भवतो जन्म परं जन्म विवस्वतः।
कथमेतद्विजानीयां त्वमादौ प्रोक्तवानिति॥
अर्थ: अर्जुन म्हणाला— तुमचा जन्म तर आत्ताच्या काळातील (नुकताच) झाला आहे आणि सूर्यदेवाचा जन्म तर कल्पारंभी (फार पूर्वी) झाला होता. मग तुम्हीच सृष्टीच्या सुरुवातीला सूर्यदेवाला हा योग सांगितला होता, हे मी कसे मानावे?
अध्याय ४, श्लोक ५ (श्रीभगवानुवाच):
बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन।
तान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परन्तप॥
अर्थ: श्रीभगवान म्हणाले— हे परंतप अर्जुना! माझे आणि तुझे यापूर्वी अनेक जन्म झाले आहेत. मला माझ्या त्या सर्व जन्मांचे स्मरण आहे, परंतु (मायेच्या प्रभावामुळे) तुला तुझ्या जन्मांचे स्मरण नाही.