Перейти к содержимому

Phopsandi Village: निसर्गरम्य फोफसंडी गावात सूर्योदय उशिरा का होतो? | Ahilyanagar | Ahmednagar

Prime Samwad

0:00 / 0:00

Phopsandi Village: निसर्गरम्य फोफसंडी गावात सूर्योदय उशिरा का होतो? | Ahilyanagar | Ahmednagar

3 350 просмотров · 1 г. назад
Prime Samwad
64,1 тыс. подписчиков
3 350 просмотров · 1 г. назад
#primesamwad #ahilyanagar #PhopsandiVillage मान मराठी - अभिमान मराठी. प्राईम संवाद चॅनल वरती तुमचं खूप खूप स्वागत. ! ------------------------------------------------------------------------ महाराष्ट्राला निसर्गाने खूप भरभरून दिलेले असून तुम्ही जर चांद्यापासून बांद्यापर्यंत महाराष्ट्राचा विचार केला तर अनेक बाबतीत आपल्याला विविधता दिसून येते. यामध्ये भाषा, लोक संस्कृती, लोक परंपरा, चालरीती इत्यादी बाबतीत विविधता दिसतेच परंतु नैसर्गिक दृष्टिकोनातून पाहिले तर मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक विविधता व भौगोलिक विविधता देखील दिसून येते.या विविधतेचा कळत नकळत परिणाम हा त्या त्या परिसरात राहणाऱ्या समाज जीवनावर होत असतो. जर आपण महाराष्ट्रातील सह्याद्री डोंगररांगांचा विचार केला तर हा परिसर निसर्ग सौंदर्याने खूपच नटलेला असून अनेक प्रसिद्ध अशी पर्यटन स्थळ या परिसरातच आहेत.मोठमोठी गडकिल्ले असो किंवा निसर्गाने मुक्तहस्ताने उथळण केलेले निसर्ग सौंदर्य असो या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळते. याच सह्याद्रीच्या डोंगर रांगांचा विचार केला तर या डोंगररांगांमध्ये असे एक छोटेसे गाव आहे की ते गाव त्याच्या वैशिष्ट्यांमुळे प्रसिद्ध आहे.महाराष्ट्रातील नगर जिल्ह्यात असलेल्या या गावात सूर्योदय होतो तो दोन ते अडीच तास उशिराने आणि सूर्य मावळतो तो दोन ते अडीच तास लवकर. म्हणजेच एकंदरीत दिवस पाहिला तर या गावात सहा ते सात तासांचा असतो. या अनोखे गाव अहमदनगर जिल्ह्यात असून या गावाचे नाव आहे फोफसंडी हे होय.फोफसंडी’ महाराष्ट्रातील सर्वात कमी सुर्यप्रकाश मिळणारे म्हणजेच सर्वात उशीरा सुर्योदय आणि सर्वात आधी सुर्यास्त होणारे गाव. सूर्योदय दोन – अडीच तास उशिरा व सूर्यास्त दोन – अडीच तास लवकर होतो..कुंजीरगडाच्या पायथ्याशी असलेले हे महाराष्ट्रातील सर्वात दुर्गम छोटे खेडेगाव. हे गाव चारही बाजूंनी डोंगरांनी वेढलेलं आहे. नाशिक पासून साधारणपणे 110 किमी अंतरावर असलेले हे गाव अहमदनगर जिल्ह्यातील अकोला तालुक्यात येते. मांडवी नदीचा उगम या गावाच्या हद्दीत होतो. इथल्या एका गुहेत मांडव्य ऋषींनी तपश्चर्या केली होती. त्यांच्या नांवावरूनच या नदीचे नाव मांडवी पडले आहे. पावसाळ्यात या ठिकाणी तुफान पाऊस पडतो. निसर्ग सौंदर्याची या गावावर मुक्तहस्ते उधळण केलेली आहे.फोफसंडी’ गावाला हे नाव मिळण्याचा इतिहास देखील खूपच रंजक आहे. फॉफ नावाचा एक इंग्रज अधिकारी दर रविवारी (संडे) सुट्टीच्या दिवशी विश्रांतीसाठी या गावात जात असे. त्यावरूनच या गावाचे नाव फॉपसंडे पडले. पुढे त्याचाच अपभ्रंश होऊन ‘फोफसंडी’ हे नाव रूढ झाले. त्या ब्रिटिश अधिकारी राहत असलेल्या गेस्ट हाऊसचे अवशेष अजून शिल्लक आहेत.निसर्गाने नटलेले मात्र अतिदुर्गम भाग असल्याने अजूनही अनेक भौतिक सुविधांपासून हे फोफसंडी हे गाव वंचित आहे.पण त्यामुळेच का होईना येथे अजून अस्सल गावपण फोफसंडी येथे टिकून आहे.फोफसंडी या गावाचे ठळक वैशिष्ट्ये म्हणजे येथे महाराष्ट्रात सर्वांत कमी वेळ सूर्यप्रकाश मिळतो. म्हणजेच सर्वात उशिरा सूर्योदय आणि सर्वात लवकर सूर्यास्त होणारे गाव म्हणजे फोफसंडी.फोफसंडीची लोकसंख्या 1200 इतकी असून बारा वाड्या व बारा आडनावाचे लोक इथे राहतात. या आडनावामध्ये प्रामुख्याने पिचड, गोरे, उंबरे, कोंडार, भद्रिके, मेमाणे इत्यादी आडनावांची लोक इथे राहतात.चार महिने पावसाळ्यात जे शेतीत उगवेल ते कमवून इतर आठ महिने रोजंदारीसाठी पुणे व ठाणे जिल्ह्यात येथील नागरिक जातात.या गावांमध्ये प्रामुख्याने भात तसेच वरई, नागली यासारखी पिके घेतली जातात. हे गाव निसर्गाने समृद्ध असून या ठिकाणी अजून पर्यंत रस्ता किंवा पाण्यासारख्या प्रमुख गोष्टींची वाणवा आहे. दुसरे महत्त्वाचे म्हणजे या ठिकाणी शेतीला पाणी नसल्यामुळे इतर कालावधीत पीक घेता येत नाहीत. आता ह्या गावात उशिरा सूर्योदय होऊन लवकर रात्र होण्यासाठी कोणत्या चमत्काराची गरज नाहीये तर काही गावांमध्ये सूर्योदय उशिरा होण्याचं मुख्य कारण म्हणजे ती गावं डोंगरांच्या दऱ्यांमध्ये किंवा उंच पर्वतांनी वेढलेल्या ठिकाणी वसलेली असतात, ज्यामुळे सूर्यप्रकाश थेट पोहोचायला वेळ लागतो. #indianvillagelife #village #villagelife ------------------------------------------------------------------------ Related Tags - dongaratall gaav, phopsandi village, Phofsandi Village, Fofsandi homestay, phopsandi, fofsandi waterfall, fofsandi village, phofsandi, Fofsandi, phofsandi Near bandhardara, fofsandi ahmednagar, Phofsandi Maharashtra, fofsandi hotel, fofsandi akole, फोपसंडी गाव, dongaravar rahnari lok, fofsandi tourism, phopsandi tourism, Somnath Nagawade, phofsandi Near Nashik, rural village life, village life, marathi youtube channel, Tourism in rural maharashtra, Rural tourism आमच्या चॅनलला Subscribe करायला विसरू नका    / @primesamwad   नक्की फॉलो करा :- 📌 Instagram: https://www.instagram.com/prime_samwa... 📌 Facebook: https://www.facebook.com/profile.php?...