राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भजन| निवडक भजन | |.कधि येशिल मनमोहना ! पाहण्या भारत अपुला पुन्हा ।।
@तुकड्यादास
0:00 / 0:00
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भजन| निवडक भजन | |.कधि येशिल मनमोहना ! पाहण्या भारत अपुला पुन्हा ।।
1 637 просмотров · 4 дня назад
@तुकड्यादास
562 подписчика
1 637 просмотров · 4 дня назад
Description
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भजन| निवडक भजन | BHAJAN SANGRAH |
३०.
कधि येशिल मनमोहना ! पाहण्या भारत अपुला पुन्हा ।।
ती मधुर तुझी बांसरी, ऐकु दे एकदा तरी ।
करी प्रसन्न अमूच्या मना,पाहण्या भारत अपुला पुन्हा ।।
भारता ग्रहण लागले, अति गुलाम जन जाहले ।
तोडण्या येई बंधना, पाहण्या भारत अपुला पुन्हा ।।
ऐश्वर्य तुझ्या वेळिचे, गोपाळ - गोपी - मेळिचे ।
नच स्वप्नि दिसे त्या खुणा,पाहण्या भारत अपुला पुन्हा ।।
तुकड्याचि आस कर पुरी, तू गरुड सावरी हरी ।
घे धाव नंद - नंदना, पाहण्या भारत अपुला पुन्हा ।।