Перейти к содержимому

मी दिल्लीला का आलोय? | Why did I come to Delhi?

Sunil D'Mello

0:00 / 0:00

मी दिल्लीला का आलोय? | Why did I come to Delhi?

6 965 просмотров · 2 месяца назад
Sunil D'Mello
149 тыс. подписчиков
6 965 просмотров · 2 месяца назад
मी दिल्लीला का आलोय? | Why did I come to Delhi? सर्वप्रथम मी नम्रपणे नमूद करू इच्छितो की मी कोणी राजकीय विश्लेषक नाही, विचारवंत नाही, समाजसेवक नाही आणि लौकिकार्थाने विद्यार्थी तर नाहीच नाही; मी सामान्य बुद्धिमत्तेचा व कुवतीचा एक जबाबदार भारतीय नागरिक आहे. शांततेच्या मार्गाने आपले म्हणणे मांडणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कारवाईची दृश्यं कोणत्याही संवेदनशील नागरिकाला विचलित करणारी होती. एका जबाबदार नागरिकाच्या नात्याने, समाजातील या मौनाविषयी मला स्वतःलाच एक नागरिक म्हणून नैतिक जबाबदारी जाणवते. गेली काही वर्षे आपल्या देशात घडणाऱ्या अनेक विषयांवर सामान्य नागरिक म्हणून आपण व्यक्त होणे टाळत आलो आहोत. आपल्या या शांततेमुळेच कदाचित प्रशासनाला व व्यवस्थेला वाटू लागले की नागरिकांचा यावर काहीच आक्षेप नाही. आपल्या संविधानाने दिलेल्या चौकटीत राहून शांततेने प्रश्न विचारणे आणि लोकशाही मार्गाने आवाज उठवणे ही आपली जबाबदारी आहे. जेव्हा शिक्षणव्यवस्थेतील त्रुटींमुळे लाखो तरुण मुलांच्या स्वप्नांचा, आशा-आकांक्षांचा प्रश्न निर्माण होतो, तेव्हा एक समाज म्हणून आपण त्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. शिक्षणात माणसाला सर्व विषमतेतून आणि अज्ञानातून बाहेर काढण्याची मोठी ताकद आहे. जेव्हा या शिक्षणव्यवस्थेवर आणि तरुणांच्या भविष्यावर प्रश्न उपस्थित होतात, तेव्हा नागरिकांनी शांततेच्या मार्गाने आपले मत मांडणे गरजेचे आहे. म्हणूनच, एक नागरिक म्हणून या घटनेकडे जवळून पाहण्यासाठी, तेथील परिस्थिती समजून घेण्यासाठी आणि तरुणांच्या पाठीशी शांततापूर्ण मार्गाने उभे राहण्यासाठी मी दिल्लीला आलो आहे. जे काम समाज म्हणून आम्ही आधीच जबाबदारीने करायला हवे होते, ते आज विद्यार्थ्यांना करावे लागत आहे. - मँगो मनुष्य २४०७२०२६ #jantarmantar #protest #delhi #education #students #marathi #citizenship #delhiprotest