पू.श्री सद्गुरुदास महाराज #Sadguru Stavan# Vibhavari Apte Joshi# Sadguru Prarthana# Madhmaad Sarang
Patrabhet Bhet Sadgurunshi
0:00 / 0:00
पू.श्री सद्गुरुदास महाराज #Sadguru Stavan# Vibhavari Apte Joshi# Sadguru Prarthana# Madhmaad Sarang
35 277 просмотров · 2 года назад
Patrabhet Bhet Sadgurunshi
4,11 тыс. подписчиков
35 277 просмотров · 2 года назад
।। श्री गुरुदेव दत्त।।
धर्मभास्कर प. पू. श्री. सद्गुरूदास महाराज ( श्रीगुरुमंदिर नागपूर )यांच्यावर रचलेले सद्गुरुस्तवन ....
गायन :सुप्रसिद्ध गायिका - विभावरी आपटे ( दीदी पुरस्कार प्राप्त )
गीतकार - शशांक देशपांडे
संगीतकार - प्रज्ञा फडणीस
संगीत संयोजन - तुषार तोत्रे
चित्रफीत संयोजन -वेदांत तळणीकर
विशेष साहाय्य : मनीष उद्धव
निर्मिती - पत्रभेट प्रकाशन
वृत्त- शार्दूलविक्रीडीत
वाहे श्रीगुरुमंदिरी नित असा भक्ति- कृपा निर्झर।
तेथे सद्गुरुदास वास नित हो अक्काईचेही स्थळ।
येई 'श्रीगुरुतत्त्व' ते अनुभवा त्याचे घडे दर्शन।
भावे सद्गुरुदास दिव्य चरणी माझे असो वंदन।।१।।
तेथे श्रीगुरु विष्णुदास वसती श्रीदत्तमूर्ती खरी।
दत्तात्रेय परंपरा वसतसे श्रीपाद-श्रीनरहरी।
प्रज्ञानंद गुरु तसेच वसते टेम्ब्ये गुरु आसन।
भावे सद्गुरुदास दिव्य चरणी माझे असो वंदन।।२।।
येथे श्रीगुरु कर्म-भक्तीसह ते ज्ञानासही सांगती।
आचारास स्वयें करुनि इतरां मार्गास ते दाविती।
आध्यात्मिक प्रयोगशील घडते येथे असे साधन।
भावे सद्गुरुदास दिव्य चरणी माझे असो वंदन।।३।।
कल्याणास्तव आमुच्या कितीतरी त्वा मंदिरे स्थापिली।
भांबेरीसह लाखनी व पवनी, भद्रावती, वासरी।
ऐसी ही गुरुमंदिरे तवकृपें भक्तांसी संजीवन।
भावे सद्गुरुदास दिव्य चरणी माझे असो वंदन।।४।।
अभ्यासे शिवराय शौर्य जगती त्वा नेटके गायिले।
गुर्वाज्ञेच व्रतस्थ राहुनी तुवा कार्यास या साधिले।
तेजस्वी नित 'धर्मभास्कर' पदी राहो स्पृहे मन्मन।
भावे सद्गुरुदास दिव्य चरणी माझे असो वंदन।।५।।
भावे शुद्ध उपासनेस करण्या केंद्रे तुवा स्थापिली।
कीर्ती श्रीगुरु विष्णुदास जगती योगे तया पोचली।
स्मर्तृगामी सदैव दत्त अमुचे श्रद्धा अशी जाणुन।
भावे सद्गुरुदास दिव्य चरणी माझे असो वंदन।।६।।
वाढावी गुरुभक्ती ही प्रतिदिनी सत्कर्म हाती घडो।
बंधूभाव परस्परात जपुनी जीवास मैत्रा जडो।
वाढो प्रेम सदा पवित्र हृदयीं पुरुषार्थ तो पंचम।
भावे सद्गुरुदास दिव्य चरणी माझे असो वंदन।।७।।
होवो नित्य उपासना तवकृपे हे मागणे मागतो।
जैसे हे नवनीत मंथुनी पहा श्री दत्त तो भेटतो।
आम्हाला सगुणातुनी तवकृपे लाभो तसे निर्गुण।
भावे सद्गुरुदास दिव्य चरणी माझे असो वंदन ।।८।।