Перейти к содержимому

महाराष्ट्रातील दोन नंबरची यात्रेचे खंडेराव महाराजांचे मंदिराच्या ,इतिहास व माहिती.

GAURAV LIVE

0:00 / 0:00

महाराष्ट्रातील दोन नंबरची यात्रेचे खंडेराव महाराजांचे मंदिराच्या ,इतिहास व माहिती.

6 207 просмотров · 3 г. назад
GAURAV LIVE
21 тыс. подписчиков
6 207 просмотров · 3 г. назад
महाराष्ट्रातील दोन नंबरची यात्रेचे खंडेराव महाराजांचे मंदिराच्या ,इतिहास व माहिती. #gauravlive #marathi #trending मल्हारमय ओझर वेशीवरच्या पाऊलखुणा : मल्हारमय ओझर अनेक वैशिष्ट्यांनी नटलेले गाव शहरांच्या कवेत आल्याने कधी कधी स्वत:तच हरविल्यासारखं वाटतं. मात्र त्यांच्यातील वेगळेपण हा एक आल्हाददायक प्रवास आहे. या प्रवासातील पाऊलखुणा पुसट झाल्या असल्या तरी आठवणींचा कल्लोळ त्या नष्ट होऊ देत नाही. अशाच विखुरलेल्या पण परिस्थितीनुसार रूपडं बदललेल्या नाशिकजवळच्या ओझर गावाने तांबटांची ठकठक ते मिग विमानांचा गगनभेदी आवाज ऐकला आहे. कधी तांबटांचं ओझर तर कधी मिग ओझर म्हणून नावारूपास आलेले हे गाव जपलेल्या प्रथा, परंपरामुळे मल्हारमय झालेले दिसते. ओझर.. तांबटांचे ओझर… मिग ओझर अशी नावे कालांतराने अंगवळणी करून घेणारे या गावाच्या नावात अनेक रहस्य दडलेली आहेत. ही रहस्ये अन् त्या गावचा इतिहास हा कायम त्याबरोबर आख्यायिका बनून राहतो. या आख्यायिका जाणून घेणे त्यावर सतत विचार मंथन होणे ही अभ्यासकांसाठी एक गरज होऊन जाते. ओझरकडे पाहताना बाणगंगेच्या तिरावर वसलेलं हे गाव ओझर का म्हटले गेले असेल, हा प्रश्न सतावतो, पण एक आख्यायिका त्याचा उलगडा करते अन् शक्य शक्यतांना पंख फुटतात. ओझर हे गाव तळ्यावर वसले आहे, असे म्हटले जाते. तळ्याभवती एखादे गाव वसू शकते पण, तळ्यावर कसे वसेल? मात्र हाच या आख्यायिकेचा गाभा आहे. ओझरमध्ये पूर्वी प्रत्येक घरात आड होती. आता काही वाड्यामध्ये अशी आड आजही पहायला मिळते. ओझरमध्ये पाणी लगेच लागते, असे म्हटले जाते. गावाच्या जमिनीखाली पाण्याचा मुबलक साठा असल्याने हे गाव तळ्यावर वसल्याची आख्यायिका ग्रामस्थ सांगतात. म्हणजेच अनेक झऱ्यांचे गाव म्हणजे ओझर का? मात्र याबाबत फक्त कयासच लावता येईल. ‘ओझर’चे तांबटांचे ओझर कसे झाले याबाबतही एक आख्यायिका आहे. तांबट गल्लीतील नरेंद्र तांबट सांगतात,‘तांब्याच्या वस्तू बनविण्यासाठी प्रसिद्ध असलेले ओझर या गावाजवळून एकदा झाशीच्या राणी लक्ष्मीबाई जात होत्या. त्यांनी तांब्याच्या वस्तू बनविताना होणारा ठकठक असा आवाज ऐकला. तो मोठ्या प्रमाणात असल्याने नेमका कसला आवाज आहे. हे पाहण्यासाठी त्या गावात आल्या. तेव्हा त्यांनी ‘तांबटांचे ओझर’ असा नामोल्लेख केला. असे माझ्या वाडवडिलांपासून सांगितली जात आहे.’ या घटनेची कुठे नोंद नसली तरी तांबटांचा मोठा व्यवसाय येथे चालत असल्याने गावाला ‘तांबटांचे ओझर’ असे नाव पडले असावे. इंग्रजांच्या दफ्तरी ‘ओझर तांबट’ अशी नोंद आहे. ही नोंद आजही प्रशासकीय कामकाजातही वापरली जाते. तर ओझरमध्ये एचएएल दाखल झाल्यानंतर मिग -२१ हे लढाऊ विमानाची निर्मिती होऊ लागल्यापासून आंतरराष्ट्रीय नकाशावर गेलेले ओझर ‘ओझर मिग’ म्हणून ओळखले जाऊ लागले. ओझरच्या नावाप्रमाणेच ओझरची सफर रोचक आहे. मुंबई-आग्रा महामार्गावर नाशिकपासून २० किलोमीटरवर ओझर हे गाव रामशेजवर उगम पावणारी व जानोरी गावापासून पुढे वाहत येणाऱ्या बाणगंगा नदीच्या तिरावर वसले आहे. बाणगंगा पुढे कोठूरेजवळ गोदावरीला मिळते. सीतामातेला तहान लागल्याने रामप्रभूने जमिनीवर मारलेल्या बाणामुळे नदी अवतरली म्हणून तिला बाणगंगा म्हटले जाते, अशी आख्यायिका ग्रामस्थ सांगतात. मात्र बाणगंगा नेहमीच भरभरून वाहते असे नाही. अनेकदा ती कोरडीच असते. यामागेही एक आख्यायिका आहे. बाणगंगेच्या किनारी साधुंचा जथा रहायला आला. हे साधु सोमवती अमावास्येच्या प्रतीक्षेत तपाला बसले. मात्र सोमवती अमावास्या येईना. त्यामुळे त्यांनी बाणगंगेला शाप दिला की, ‘तू वर्षभरही कोरडीच राहशील.’ पुढे हे साधू नाशिकला गोदावरीच्या किनारी येऊन राहिले. सहा महिन्यांनी सोमवती अमावास्या आली अन् आनंदीत झालेल्या साधुंनी गोदेला येथे कुंभमेळा भरेल, असा आशीर्वाद दिला अन् तेव्हापासून नाशिकला गोदातिरी कुंभमेळा भरू लागला, अशी आख्यायिका नदी बाणगंगा कोरडी असण्यामागे सांगितली जाते. तर ओझर परिसरातून राम, सीता व लक्ष्मण गेल्याने दाखले पुराणात असल्याचे विठ्ठलराव चौधरी, धनंजय पगार, भरत कावळे सांगतात. गावात प्रवेश करताना महामार्गावरच डाव्या हाताला खंडोबाचे मंदिर व त्यासमोरील उंच दीपमाळ आपले स्वागत करते. हे मंदिर नव्याने बांधलेले आहे. खंडोबाचे जुने मंदिर मंदिरासमोरच महामार्गापलीकडे आहे. खंडेरायाचे नवीन मंदिर बांधले असले तरी ग्रामस्थांनी जुने मंदिरही तेवढ्याच भक्तीभावाने जपले आहे. येथील खंडेरायाची मूर्ती, आदिमाया म्हाळसादेवी, अश्वाच्या टापाखाली मल्लासुराला चेंगरल्याची मुद्रा असे प्रसन्न करणारे दर्शन येथे लाभते. मंदिराजवळच सहा पुराणपुरुषांच्या समाधी आहेत; तर पुढच्या बाजूला अश्वांच्या सहा समाधी आहेत. देवाला जे अश्व सोडण्यात येतात त्यांच्या या समाधी असल्याचे ग्रामस्थ सांगतात. खंडेरायाची ही दोन्ही मंदिरे पूर्वीच्या वेसकोट रचनेनुसार गावाबाहेर आहेत. मारूती वेशीसमोरच्या बाणगंगेवरील पूल ओलांडला की, जुने खंडेरायाचे मंदिर आहे. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते षष्ठी या सहा दिवसांत शंकराने thank you so much for watching 😊❤️🙏