एकासाठी अकरावा २०
Darshandarpan दर्शनदर्पण
0:00 / 0:00
एकासाठी अकरावा २०
147 просмотров · 4 нед. назад
Darshandarpan दर्शनदर्पण
1,42 тыс. подписчиков
147 просмотров · 4 нед. назад
श्रीमद्भागवताच्या अकराव्या स्कंधामध्ये मुक्तीचे वर्णन आले आहे. वैराग्य निर्मितीच्या प्रयोजनाने यदुवंशाला प्राप्त झालेल्या शापाचे वर्णन करून पुढे भगवंतांच्या 'स्व'रूपाच्या वर्णनास आरंभ होतो . परमानंद स्वरूप भगवान श्रीकृष्णांच्या सगुण लीलांचे वर्णन दशम स्कंधात करून पुढे निवृत्ती मार्गाद्वारे भगवंतांच्या धामाची जी प्राप्ती होते त्याचं वर्णन अकराव्या स्कंधात येतं.
नाथ महाराज म्हणतात 'पाहोनि दशमाचा प्रांतू। एकादशाच्या उदयाआंतू।'
दशम स्कंधातून एकादशाचा उदय दिसून येतो. सर्व उपाधींमाजी लपलेले एक असणारे परमात्मतत्त्व जाणण्यासाठी हा अकरावा स्कंध प्रवृत्त होतो. या अध्यायातील विषयांचे यथाानुरूप संक्षेप व विस्ताराने चिंतन आपण या मालिकेतून करणार आहोत.