Перейти к содержимому

पौष्टिक चविष्ट दुधीचे डोसे आरोग्यासाठी खूपच छान

Chitra's Food & journey

0:00 / 0:00

पौष्टिक चविष्ट दुधीचे डोसे आरोग्यासाठी खूपच छान

299 просмотров · 8 дней назад
Chitra's Food & journey
2,76 тыс. подписчиков
299 просмотров · 8 дней назад
🥒 पौष्टिक चविष्ट दुधीचे डोसे साहित्य : १ कप रवा १ छोटी वाटी पोहे पाव किलो दुधी अर्धी वाटी पाणी कोथिंबीर हिरवी मिरची लसूण १ चमचा तीळ ½ चमचा हळद इनो — अर्धे पॅकेट (आवडीनुसार; नको असल्यास वगळू शकता) 👩‍🍳 कृती : सर्वप्रथम पोहे, रवा, दुधी, कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण आणि पाणी मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. हे मिश्रण एका भांड्यात काढून त्यामध्ये तीळ आणि हळद घालून चांगले एकजीव करून घ्या. डोसे बनवण्याच्या अगोदर त्यामध्ये इनो घालून हलक्या हाताने मिक्स करा. इनोमुळे डोसे छान जाळीदार आणि नरम होतात. इनो नको असल्यास तो स्किप करू शकता. पॅन गरम करून त्यावर लगेच डोसे घालून दोन्ही बाजूंनी छान भाजून घ्या. आवडीनुसार चटणीसोबत गरमागरम दुधीचे डोसे सर्व्ह करा. 😋 हे डोसे खूप नरम, चविष्ट आणि पौष्टिक होतात. मुलांच्या टिफिनसाठी, वयोवृद्धांसाठी आणि घरातील सर्वांसाठी एकदम मस्त नाश्ता! ❤️ एकदा नक्की करून पाहा आणि रेसिपी आवडली तर Like 👍 Share आणि Subscribe करायला विसरू नका. 🙏