Перейти к содержимому

Shri Swami Samarth in Akkalkot ( अक्कलकोट )

Patil Mahesh

0:00 / 0:00

Shri Swami Samarth in Akkalkot ( अक्कलकोट )

64 просмотра · 4 дня назад
Patil Mahesh
2 подписчика
64 просмотра · 4 дня назад
प्रसिद्ध वचन 'भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे' अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराजांचे स्थान म्हणुन अक्कलकोट प्रसिध्द आहे. अक्कलकोट शहर सोलापूर जिल्हा मुख्यालयापासून ३८ कि मी अंतरावर वसलेले आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांना श्री दत्तात्रयाचे अवतार मानले जाते. श्री स्वामी समर्थांची समाधी भक्ताकडून पुजली जाते. दर वर्षी चैत्र शुद्ध त्रयोदशीला स्वामी समर्थांची पुण्यतिथी साजरी केली जाते. राज्यातून व पर राज्यातून मोठ्या संख्येने भक्त गण नित्य नेमाने भेट देतात. सध्याचे स्वामी समर्थ मंदिर हे एका वडाच्या झाडाच्या भोवती बांधले आहे. ह्याच वडाच्या झाडाखाली बसून श्री स्वामी समर्थ ध्यान धारणा करीत व भक्तांना उपदेश देत असत. मंदिराच्या परिसरात मुख्य मंदिर, सभा मंटप व भक्तांसाठी राहण्याची व्यवस्था आहे. मंदिर समितीतर्फे भक्तांसाठी अन्नछत्रामध्ये रोज दुपारी व रात्री मोफत भोजनाची (प्रसादाची) व्यवस्था करण्यात आलेली आहे. श्री स्वामी समर्थ महाराज हे शके १७७९ च्या सुरुवातीला अक्कलकोट येथे आले. श्री दत्तात्रयाचे चौथे अवतार मानले गेलेल्या श्री स्वामी समर्थांचा एकूण कार्यकाळ ४० वर्षाचा आहे त्यापैकी २१ वर्षे त्यांचे वास्तव्य अक्कलकोट येथे होते. श्री स्वामी समर्थांची पवित्र समाधी त्यांचे शिष्य श्री चोळप्पा ह्यांचा घरात आहे. हे ठिकाण समाधीमठ असे ओळखले जाते. भक्तांना संकट प्रसंगी धीर व मानसिक बळ देणारे “भिऊ नकोस – मी तुझ्या पाठीशी आहे” हे घोष वाक्य श्री स्वामी सामार्थांचेच आहे. अक्कलकोटला (स्वामी समर्थ महाराज मंदिर) भेट देण्यासाठी तुम्ही ट्रेन, बस किंवा स्वतःच्या गाडीने सोप्या पद्धतीने जाऊ शकता. सर्वात जवळचे मोठे शहर सोलापूर (४० किमी) आहे. जवळचे रेल्वे स्टेशन 'अक्कलकोट रोड' (१३ किमी) आहे, तर पुण्याहून अंतर २९२ किमी आणि मुंबईहून सुमारे ४०० किमी आहे. रेल्वेने (Train) जवळचे रेल्वे स्टेशन: अक्कलकोट रोड (AKOR) हे शहरापासून १३ किमी अंतरावर आहे. मुख्य रेल्वे स्टेशन: सोलापूर जंक्शन हे अक्कलकोटपासून ४० किमी अंतरावर आहे, वलून तिथून टॅक्सी किंवा बस available असते. रस्ता मार्गाने (Road/Bus) सोलापूर, पुणे आणि मुंबई येथून राज्य परिवहनच्या (MSRTC) बस आणि खाजगी बस सतत धावतात. सोलापूरहून अक्कलकोटसाठी दर तासाला बस किंवा जीप मिळतात. कार किंवा टॅक्सीने सोलापूर-अक्कलकोट राष्ट्रीय महामार्गाने ४५ मिनिटांत पोहोचू शकता धार्मिक महत्त्व श्री स्वामी समर्थ महाराज: अक्कलकोट हे १९ व्या शतकातील महान संत श्री स्वामी समर्थ महाराजांचे निवासस्थान व पवित्र समाधी स्थळ म्हणून ओळखले जाते. दत्त अवतार: स्वामी समर्थांना भगवान दत्तात्रेयांचे अवतार मानले जाते. वटवृक्ष मंदिर: येथील प्रसिद्ध वटवृक्ष स्वामी मंदिर हे भाविकांच्या श्रद्धेचे