🚩||श्री अंबा आरोग्य भवानी डोंगर तुकाई , परळी वैजनाथ || Dongar Tukai , Parli Vaijnath|| - I N T R O
I N T R O
0:00 / 0:00
🚩||श्री अंबा आरोग्य भवानी डोंगर तुकाई , परळी वैजनाथ || Dongar Tukai , Parli Vaijnath|| - I N T R O
3 860 просмотров · 5 л. назад
I N T R O
1,33 тыс. подписчиков
3 860 просмотров · 5 л. назад
श्री अंबा आरोग्य भवानी डोंगर तुकाई , परळी वैजनाथ- बीड
नाव : श्री अंबा आरोग्य भवानी डोंगर तुकाई
वास्तुकला : हिंदू
स्थान: महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यामध्ये परळी वैजनाथ.
श्री डोंगर तुकाई देवी
पुराणकाळी भगवान शंकर व माता पार्वती एकदा वार्तालाप करत असताना शंकर म्हणाले श्रीरामा सारखा एक वचनी, बाणेदार एक पत्नी , असणारा दुसरा कोणी नाही हे ऐकल्यावर पार्वतीला खात्री पटेना .आपण परीक्षा घेऊन पाहू. म्हणून एकदा पार्वतीने सीतेचे रूप घेतले व श्रीराम समोर आली. श्रीरामाने ओळखले आणि तिला म्हणाले , ‘ तू का आई , तू का आली आई ! तू तर माता पार्वती!’ तेव्हा पार्वती मातेला श्रीरामाची महत्त्व पटले. या कथेवरूनच श्री तुकादेवी म्हणून या देवीची ओळख पडली. डोंगरावर हे स्थान असल्याने श्री डोंगर तुकाई म्हणून हे स्थान ओळखले जाऊ लागले.
पुराणकाळात परळीतील श्री तुळजाभवानी देवीचे भक्त श्री आयचित, ब्राह्मण पुरोहित नियमित तुळजापूरला भवानी मातेच्या दर्शनाला जात. एकदा देवी त्यांना प्रसन्न झाली.देवीने तुळजापूर क्षेत्रि या भक्ताला दर्शन दिले. मातेचे दर्शन घेऊन हे पुरोहित परळी कडे निघाले तेव्हा, देवीने गाव येईपर्यंत मागे वळून पाहू नको, ‘ अशी आज्ञा केली. पुरोहित चालत निघाले. चालत असताना मागून पायातील खडावा चा आवाज ऐकू येऊ लागला. परळी परिसरात आल्यानंतर हा आवाज येणे अचानक बंद झाले. ज्या ठिकाणी हा आवाज येणे बंद झाले. ते ठिकाण होते गोंधुमाळ डोंगराचे. या पुरोहिताने मागे वळून पाहिले तेव्हा साक्षात भवानी माता त्यांना दृष्टीस पडली. या ठिकाणी मातेने मूर्ती रूप धारण केले. पुढे येथे मंदिर बांधण्यात आले. अशी ही कथा या स्थानाबद्दल सांगितली जाते.
या ठिकाणी देवीच्या दोन मूर्ती आहेत. प्रभू श्रीरामाला दर्शन दिलेली सीतेच्या रूपातील माता पार्वती व दुसरी तुळजाई अर्थात अंबा आरोग्य भवानी. वेगवेगळ्या रूपातील या दोन्हीही ‘माता पार्वतीच!’ असे भाविक सांगतात. डोंगर तुकाई, अंबामाता आरोग्य भवानी या नावाने या देवीची ओळख आहे.
परळी परिसरात चार किलोमीटर अंतरावर चांदापूर- घाटनांदुर मार्गावरील डोंगरावर श्री डोंगर तुकाई देवीचे मंदिर असून या डोंगराला गोंधुमाळ हे स्थानिक नाव आहे. दगडी बांधकामाचे हे प्राचीन मंदिर आहे. जागृत देवस्थान म्हणून हे स्थान प्रसिद्ध आहे. परळीकरांच्या दृष्टीने तुळजापूरच्या श्री भवानीदेवी एवढेच महत्त्व या स्थानाला असल्यामुळे परळीकरांची ‘तुळजाई’ म्हणून श्री डोंगर तुकाई देवी ओळखली जाते .डोंगर तुकाई चे मंदिर तुळजापूरच्या श्री भवानीदेवीच्या ठाण असल्याचे भाविक सांगतात. हे मंदिर जमिनीपासून सुमारे दोनशे फूट उंच डोंगरावर आहे.या मंदिराला जाण्यासाठी पायर्या आहेत. देवीच्या मंदिराच्या खाली तळघरात श्री दत्तात्रयाचे तिसरे अवतार स्वामी नरसिंह सरस्वती यांनी तपश्चर्या आणि अनुष्ठान केल्याचा उल्लेख धार्मिक ग्रंथात सापडतो. येथेच ‘श्री गुरुचरित्र’ या ग्रंथाला लेखनाला सुरुवात झाल्याचे सांगतात. याचा उल्लेख श्री गुरुचरित्र ग्रंथात चौदा-पंधरा ,सोहळा या अध्यायात सापडतो. याच ठिकाणाहून स्वामींनी आपल्या शिष्यांना विविध तीर्थस्थानाचे जाण्याची आज्ञा केली होती. एक वर्षापेक्षा अधिक काळ परमपूज्य स्वामी नरसिंह सरस्वती येथे तपश्चर्येला होते. भवानी देवी व सीतेच्या रूपातील माता पार्वती देवी तसेच परमपूज्य स्वामी नरसिंह सरस्वती यांच्या वास्तव्याने पावन झालेले हे निसर्गरम्य स्थान आहे. नवरात्र उत्सवात येथे देवीचा मोठा उत्सव असतो .उत्सवाला जत्रेचे स्वरूप येते. यावेळी भाविकांची मोठी गर्दी असते.आराधी, गोंधळी, परडी वाले, घटी बसले याचा मोठा मेळाच नऊ दिवस या डोंगरावर असतो. देवीची गाणी, ‘आई राजा उधो उधो ’जयघोषाने हा परिसर दणाणून जातो.अष्टमीला मध्यरात्रीच्या सुमारास देवीपुढे होम पेटतो. यावेळीही विविध धार्मिक कार्यक्रम येथे असतात. मंगळवारी, शुक्रवारी देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी असते. चैत्र महिन्यात प्रारंभी येणाऱ्या चैत्र नवरात्र उत्सवात व चैत्र पौर्णिमेलाही येथे दर्शनासाठी गर्दी पडते. मार्गशीर्ष पौर्णिमेला म्हणजे श्री दत्त जयंतीला येथे कीर्तन, आरती, महाप्रसादाचा कार्यक्रम होतो.
वैद्यनाथ ज्योतिर्लिंग - 👉🏻 • परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग||Parli Vaijnath j...
सोमेश्वर मंदिर - 👉🏻 • श्री सोमेश्वर संस्थान जिरेवाडी,परळी वैजनाथ...
🎥
तुम्हाला नवनवीन गोष्टी , प्रार्थनास्थळे, मंदिर, ऐतिहासिक प्राचीन वास्तुरचना , किल्ले , पर्यटन स्थळे , प्रसिद्ध ठिकाण पाहण्याची आवड असेल तर नक्की सबस्क्राईब करा आमचे चॅनल - Intro
हे चॅनल खास पर्यटकांसाठी , स्थानिक लोकांसाठी, नवनवीन माहिती जाणून घेणार्यांसाठी ,विद्यार्थ्यांसाठी, इत्यादींसाठी अशे आमचे चॅनल - Intro.
आमच्या चॅनल ला भेट दिल्याबद्दल आणि आम्हाला प्रोत्साहन दिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद 🙏🏻👍🏻☺️
Thanks for watching and supporting our channel - Intro
Instagram -
https://instagram.com/introcreation7?...
Facebook - / atrey.itake
Twitter -https://twitter.com/Intro38873094?s=09
Intro Team :
1. Atrey Dipak Itake
2. Abhishek Nagnath Rajmane
3. Govind Patange
4. Yash Ganesh Hirve
5. Sunny Ganesh Hirve
6. Tanmay Alse
7. Ram Jagmitra Jadhav
8. Hariom Someshwar Lingade
9. Saurabh Prakash Itake
#news #trending #travel #Parlivaijnath #parlivaijnath #films