विद्यार्थी शिक्षक होऊन शिक्षक दिन साजरा करतात
Ravi Dhage
0:00 / 0:00
विद्यार्थी शिक्षक होऊन शिक्षक दिन साजरा करतात
170 просмотров · 2 недели назад
Ravi Dhage
364 подписчика
170 просмотров · 2 недели назад
🌷 शिक्षक दिन विशेष | एक दिवस विद्यार्थ्यांचा… अनुभव जबाबदारीचा! 🌷
शिक्षकांना अजून काय पाहिजे? ❤️
जेव्हा विद्यार्थी आत्मनिर्भर, जबाबदार आणि नेतृत्वक्षम होतात, तेव्हा त्यापेक्षा मोठे समाधान शिक्षकांसाठी दुसरे कोणतेच नाही!
👩🏫 आज शिक्षक दिनानिमित्त जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, मारतळा येथे इयत्ता ७ वीच्या विद्यार्थ्यांनी संपूर्ण शाळेचे नियोजन व व्यवस्थापनाची जबाबदारी स्वतः सांभाळली.
📚 इयत्ता १ ली ते ६ वीच्या विद्यार्थ्यांना शिकवणे,
🏫 मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, सुपरवायझर, शिक्षक अशा विविध भूमिका निभावणे,
🧹 सफाई कर्मचारी म्हणून जबाबदारी पार पाडणे…
अशा विविध भूमिकांमधून विद्यार्थ्यांनी शाळा चालविण्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.
ही केवळ शिक्षक दिनाची आगळीवेगळी कल्पना नाही,
तर ‘विद्यार्थ्यांमधील नेतृत्वगुण, आत्मविश्वास, जबाबदारी आणि आत्मनिर्भरता विकसित करणारी भविष्यवेधी शिक्षणाची पायरी’ आहे! 🌱✨
आज विद्यार्थी शिक्षक झाले…
आणि शिक्षक अभिमानाने विद्यार्थ्यांकडे पाहत राहिले! ❤️
🏫 जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, मारतळा
ता. लोहा, जि. नांदेड