राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भजन| निवडक भजन | भाग १९ | BHAJAN SANGRAH | SHRI MOHAN GAIGOL COLLECTION
Rashtrasant Tukdoji Maharaj Vichar
0:00 / 0:00
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भजन| निवडक भजन | भाग १९ | BHAJAN SANGRAH | SHRI MOHAN GAIGOL COLLECTION
105 864 просмотра · 5 лет назад
Rashtrasant Tukdoji Maharaj Vichar
16,4 тыс. подписчиков
105 864 просмотра · 5 лет назад
आमच्या चॅनल ला आपण दान देऊ शकता , या चॅनल वर ads बंद आहे 🙏🙏
GOOGLE PAY : 7038205363
You can contribute to our channel :
GOOGLE PAY : 7038205363
९१.
संसाराचा बोझ वाहता, लागलास मरणाला ।
नेशी साथी कुणाला ? ।।
जन्मभरी भोगुनी वैभवा, नाश धनाचा केला ।
रक्त शोषुनी गरीब जनांचे, सुख ना दिले कुणाला ।
मान नाही अन् किर्ती न कांही,उगाच फिरला हेला ।।
धर्म वर्म ना शिकला, साधू-संग मुळी नच केला ।
तीर्थ न केले, व्रत ना धरले,दान न दिले कुणाला ।।
विषय भोगता इंद्रिय गळले, मोह न अजुनि सुटला।।
धन दारा सुत नाती गोती, व्याप करुनिया बसला ।
प्रेम न केले शेजाऱ्यावर, दुसऱ्या पाहूनि हसला ।।
प्रभु स्मरणाला वेळचि नव्हती,सांगशी काय यमाला ।।
९२.
सच काम किया जग में जिसने,उसने प्रभुनाम लिया न लिया।
अपने मनको बसमें हो किया,वह चारों ही धाम गया न गया।।
है जिसके जबाँपर प्रेम भरा, कटुता पटटुता का गर्व नहीं।
हर मानव से समता जिसकी,वह मन्दर ध्यान किया न किया।।
सेवा ही बना जीवन जिसका, बदला न चहे दिल से किसका।
जो मस्त रहे अपने धुन में, वह गुरु का मंत्र लिया न लिया।।
सब भेख बराबर है जिसको, सब संत और पंथसे प्रेम वही।
जिसके भाषण में झूठ नहीं, वह ग्रंथ का पाठ किया न किया।।
यदि मौत भी आय किसी क्षण में, या संकट पर्वत प्राय: पढड़ें।
तुकड्या कहे जो डरता न उसे,तब औरों का साथ लिया न लिया।।
९३.
अंगी नाही ज्ञान,म्हणे साधु मला मान !
साधु नावानं साधु होत नाहि होsss !
साधु हॉटेलचा चहा-पाणि नाही हो ! ।।
जंगलच्या अस्वलिला मोठ्या-मोठ्या जटा !
पारधी लंगोटीनं त्यागि दिसे मोठा ! !
कुत्र्याच्या अंगावर भगव्याची छटा !
गाढवाच्या अंगी नाहि भस्माचा तोटा ! !
साधु हॉटेलचा चहा-पाणि नाहि हो ! ।।
साधूचं साधुत्व नाही पंथात !
साधूचं साधुत्व नाही तीर्थात ! !
साधूचं साधुत्व नाही वर्णात !
जाती-पातित नाही साधूची मात !
साधु हॉटेलचा चहा-पाणि नाही हो ! ।।
सत्याचरणाविण साधुत्व नाही ।
आत्म - ज्ञानाविण साधुत्व नाही ।
प्रभू - भजनाविण साधुत्व नाही ।
तुकड्यादास म्हणे, ऐका हि ग्वाही ।
साधु हॉटेलचा चहा-पाणि नाही हो ! ।।
९४.
कोण दिवस येइ (येतो) कसा, कोण जाणतो ? ।।
एक दिवस हत्तिवरी,मिरविति त्या नवऱ्यापरि ।
एक दिवस मिठ-भाकरि, दारि मागतो ।।
एक दिविस वस्त्र जरी, क्रिडताति महालांतरि ।
एक दिवस चिंधि घरी नाहि सांगतो ।।
एक दिवस मान जनी,चवरी डुलतील तनी ।
एक दिवस न पुसे कुणि, सोडि प्राण तो ।।
ऐसा हा विधि-लिखीत, जीवांना त्रास देत ।
तुकड्याची मात नव्हे, शास्त्र बोध तो ।।
९५.
तेरा प्यारा है नाम, तेरा प्यारा है नाम ।
देता दिल को आराम, पुरे करता है काम ॥
आवो प्यारे सब मिल आवो ।
एकचित्त से ध्यान लगावो ।
गावो मिलके तमाम ॥
हनुमान ने नाम पुकारा ।
पुरा समुंदर पार कर डाला ।
पाया है शक्ती महान ॥
मीराने हरिनाम जप लीनी ।
सुधबूध खोयी हूयी दिवानी ।
कहे तुकड्या पाये है निजधाम ॥