Maharashtra Drought Relief 265 तालुक्यांत दुष्काळ जाहीर, शेतकऱ्यांना मदत कशी मिळणार ? कधी मिळणार?
MH20-MARATHI
0:00 / 0:00
Maharashtra Drought Relief 265 तालुक्यांत दुष्काळ जाहीर, शेतकऱ्यांना मदत कशी मिळणार ? कधी मिळणार?
296 просмотров · 3 нед. назад
MH20-MARATHI
236 подписчиков
296 просмотров · 3 нед. назад
पाऊस कमी झाल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून राज्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी दौरा केला. यावेळी शेतकऱ्यांना योग्य ती भरपाई दिली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं. तसंच दुष्काळ जाहीर करण्याचं आश्वासन सुद्धा सरकारने दिलं होतं. अखेर शनिवारी राज्य सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारने २६ सप्टेंबरला काढलेल्या जीआरनुसार राज्यात आता दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. राज्यातील 358 पैकी 265 तालुक्यातील शेतकऱ्यांना लाभ देणारा निर्णय सरकारने घेतला आहे. महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर झाल्याने आता दुष्काळाच्या विविध उपाययोजना जाहीर होऊन त्यांची अंमलबजावणी केली जाईल. राज्य सरकारने जाहीर केलेल्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाचा शेतकऱ्यांना फायदा कसा होणार, शेतकऱ्यांना कोणते लाभ मिळणार सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओमधून..