Перейти к содержимому

Maratha Reservation: Manoj Jarange यांचं ११ वं आंदोलन, मुंबईत धडकण्याचा इशारा, सरकारची कोंडी होणार?

BolBhidu

0:00 / 0:00

Maratha Reservation: Manoj Jarange यांचं ११ वं आंदोलन, मुंबईत धडकण्याचा इशारा, सरकारची कोंडी होणार?

69 522 просмотра · 14 часов назад
BolBhidu
2,89 млн подписчиков
69 522 просмотра · 14 часов назад
#BolBhidu #ManojJarangePatil #MarathaReservation आता एकतर मी जाईन, नाहीतर सरकार जाईल, असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या १०व्या निर्णायक आंदोलनाला सुरुवात केलीय. आता फक्त जीआर काढून भागायचं नाही, तर अंमलबजावणी झाली पाहिजे, अशी भूमिका आता जरांगेंनी घेतलीय. या आंदोलनासाठी जरांगेंनी राज्यातल्या मराठा समाजाला आवाहन केलं होतं. हे शेवटचं आणि निर्णायक आंदोलन आहे. हे आंदोलन इतक्या ताकदीने उभं करायचं की मराठा समाजाचे प्रश्न पुन्हा कधीही मागे पडणार नाहीत, असं जरांगे पाटील यांनी सांगितलं होतं. जरांगेंच्या या हाकेला प्रतिसाद देत राज्यभरातून मराठा समाजाने आंतरवली सराटीत मोठी गर्दी केली आहे. ट्रॅक्टर, रिक्षा घेऊन मराठा समाजाचे लोक आंतरवली सराटीत दाखल होत आहेत. जरांगे पाटील यांनी आपल्या उपोषणाला सुरुवात केली आहे. जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर आम्ही मुंबईत धडकणार असल्याचा इशारा सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. या आंदोलनासाठी मराठा समाजाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. आंतरवली सराटीत मोठा मंडप टाकण्यात आला आहे. पण आता जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही मुंबईत येणारच, आम्हाला अडवून दाखवा, असा थेट इशारा मनोज जरांगे पाटील यांच्याकडून देण्यात आलाय. पण या आंदोलनासाठी जरांगे पाटील आणि मराठा समाजाकडून तयारी कशी करण्यात आलीय, मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत येण्याबद्दल नक्की काय सांगितलंय, सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओमधून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.    / @bolbhidu   ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook :   / ​bolbhiducom   ➡️ Twitter :   / bolbhidu   ➡️ Instagram :   / bolbhidu   ➡️Website: https://bolbhidu.com/