Перейти к содержимому

Bangladesh : शेख हसीनांना शिक्षा सुनावली, पुढे काय?

Bharat Shakti Marathi

0:00 / 0:00

Bangladesh : शेख हसीनांना शिक्षा सुनावली, पुढे काय?

295 просмотров · 10 месяцев назад
Bharat Shakti Marathi
3,19 тыс. подписчиков
295 просмотров · 10 месяцев назад
इंटरनॅशनल क्राइम्स ट्रायब्यूनल अर्थात आंतरराष्ट्रीय गुन्हे लवादाने बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांना‌ मागील वर्षी झालेल्या निदर्शनांदरम्यान मानवतेविरुद्ध केलेल्या गुन्ह्यांसाठी मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. सध्या भारताच्या राजकीय आश्रयाला असलेल्या शेख हसीना यांचे प्रत्यार्पण बांगलादेशला करावे, अशी मागणी लगेचच करण्यात आली. मात्र त्यावरील भारताची प्रतिक्रिया अनेकांना काहीशी गोंधळवून टाकणारी वाटली.भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रत्यार्पणाच्या मागणीवर ठाम प्रतिक्रिया का दिलेली नाही? मुळात हसीना यांना मृत्युदंडाची शिक्षा होईल, अशी भारताला शक्यता वाटत होती का? या शिक्षेवर हसीना यांनी दिलेली प्रतिक्रिया नेमके काय सांगण्याचा प्रयत्न करणारी आहे? या सगळ्याचा परिणाम भारत आणि बांगलादेश यांच्यातील संबंधांवर कसा होऊ शकतो? या प्रकरणी भारताची आंतरराष्ट्रीय पातळीवरील भूमिकेवर टीका होण्याची शक्यता किती आहे? अशा अनेक मुद्द्यांवर आजच्या रणनीतीच्या भागात भारतशक्ती मराठीचे मुख्य संपादक नितीन अ. गोखले यांनी मार्गदर्शन केले आहे. #SheikhHasina #AwamiLeague #BangladeshVerdict #ICT #CrimesAgainstHumanity #DeathSentence #BangladeshPolitics #DhakaCourt #IndiaBangladesh #InternationalJustice #RegionWatch #HumanRightsWatch #PoliticalStorm