Перейти к содержимому

देशमुखांच्या महालक्ष्मी गौराईंचा प्रबोधनात्मक देखावा | Tukaram Mundhe | दूध उत्पादक शेतकरी | Akluj

DD Maharashtra

0:00 / 0:00

देशमुखांच्या महालक्ष्मी गौराईंचा प्रबोधनात्मक देखावा | Tukaram Mundhe | दूध उत्पादक शेतकरी | Akluj

115 733 просмотра · 3 дня назад
DD Maharashtra
27,3 тыс. подписчиков
115 733 просмотра · 3 дня назад
#देशमुखांच्यामहालक्ष्मी #अकलूजच्यादेशमुखांच्यामहालक्ष्मी #गौरीगणपती #गौरीदेखावा #प्रबोधनात्मकदेखावा #शुद्धतेतूनसमृद्धीकडे #तुकाराममुंढे #TukaramMundhe #दूधउत्पादकशेतकरी #दूधभेसळ #शुद्धदूध #शेतकरीसन्मान #गौराई #महालक्ष्मी #गौरीआगमन #गणपतीउत्सव #सामाजिकप्रबोधन #अकलूज #Akluj #GauriGanpati #MarathiCulture Akluj Gauri Ganapati 2026 Deshmukh Family Gaurai Decoration Akluj Tukaram Mundhe Decoration in Gauri Ganpati Farmer Decoration दूध उत्पादक शेतकऱ्यांचा देखावा अकलूज Akluj Famous Gauri Ganpati Ganapati Decoration 2026 घरगुती गणपती बाप्पा सजावट गणपती बाप्पा मोरया Deshmukh Family Gauri Ganpati Decoration ● शुद्धतेतून समृद्धीकडे ● अकलूजमध्ये देशमुखांच्या महालक्ष्मी अवतरल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या रुपात "अकलूजमधील संगिता देशमुख यांच्या घरी यंदा गौरी-गणपतीच्या चरणी सामाजिक प्रबोधनाचा एक अनोखा आणि धडाकेबाज 'मुंढे पॅटर्न' अवतरला आहे. गौरी गणपती समोरच्या देखाव्यातून देशमुख परिवाराने समाज आरोग्याशी निगडित असलेल्या दूध भेसळीच्या ज्वलंत प्रश्नावर थेट भाष्य केलंय. ग्रामीण घराच्या अंगणात, साक्षात गौराई हातामध्ये शुद्ध दुधाची किटली घेऊन अवतरल्याचा प्रसंग प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतोय. भेसळयुक्त दुधावर कारवाई करुन, दूध उत्पादक शेतकऱ्याच्या कष्टाला न्याय देणारे धडाडीचे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे आणि एफडीए (FDA) प्रशासनाप्रती या देखाव्यातून मोठी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली आहे. आपल्या दुधाची शुद्धता राखल्याबद्दल मुखात हार घेऊन मुंढे साहेबांचे आभार मानणारी गाय आणि सोबतीला उभी असलेली शेतकरी महिला, प्रशासकीय जरबेमुळे बळीराजाच्या दुग्धव्यवसायाला मिळालेली नवसंजीवनी हा देखावा हुबेहूब जिवंत करत आहे. धार्मिक परंपरेला सामाजिक भान आणि कर्तव्यदक्ष शासकीय मोहिमेची जोड देणारा हा राज्यातील एक अत्यंत संवेदनशील आणि कौतुकास्पद देखावा ठरत आहे. __________________________ गौरी गणपती चरणी प्रार्थना दूध भेसळीविरोधातील कडक कारवाईमुळे शुद्ध दुधाची मागणी वाढली आहे आणि याचा थेट व न्याय्य फायदा प्रामाणिक दूध उत्पादक शेतकऱ्यांना मिळावा आणि राज्यावरील दुष्काळाचे सावट दूर व्हावे हीच यंदाच्या गौरी गणपती समोरील देखावा साकारण्यामागाची मूळ संकल्पना होती. आपल्याला देखावा आवडल्यास कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा !