Перейти к содержимому

जय जय त्र्यंबकराज आरती - Jai Jai Trimbakraj aarti.

Gitesh Nilesh Joshi

0:00 / 0:00

जय जय त्र्यंबकराज आरती - Jai Jai Trimbakraj aarti.

30 865 просмотров · 4 мес. назад
Gitesh Nilesh Joshi
996 подписчиков
30 865 просмотров · 4 мес. назад
जय जय त्र्यंबकराज गिरिजानाथा गंगाधरा हो ॥ त्रिशूलपाणी शंभो नीलग्रीवा शशिशेखरा हो ॥ वृषभारूढ फणिभुषण दशभुज पंचानन शंकरा हो ॥ विभूतिमाला जटा सुंदर गजचर्मांबरधरा हो ॥ ध्रु० ॥ पडलें गोहत्येचें पातक गौतमऋषिच्या शिरीं हो ॥ त्यानें तप मांडिलें ध्याना आणुनि तुज अंतरीं हो ॥ प्रसन्न हो‍उनि त्यातें स्नाना दिधली गोदावरी हो ॥ औदुंबरमुळिं प्रगटे पावन त्रैलोक्यातें करी हो ॥ जय० ॥ १ ॥ धन्य कुशावर्ताचा महिमा वाचे वर्णूं किती हो । आणिकही बहु तीर्थें गंगाद्वारादिक पर्वतीं हो ॥ वंदन मार्जन करिती त्यांचे महादोष नासती हो ॥ तुझिया दर्शनमात्रें प्राणी मुक्तीतें पावती हो ॥ जय० ॥ २ ॥ ब्रह्मगिरीची भावें ज्याला प्रदक्षिणा जरि घडे हो ॥ तैं तैं काया कष्टे जंव जंव चरणीं रुतती खडे हो ॥ #shiv तंव तंव पुण्यविशे किल्मिष अवघें त्यांचें झडे हो ॥ केवळ तो शिवरूप काळ त्याच्या पायां पडे हो ॥ जय० ॥ ३ ॥ लावुनियां निजभजनीं सकळहि पुरविसि मनकामना हो ॥ संतति संपति देसी अंतीं चुकविसि यमयातना हो ॥ शिव शिव नाम जपतां वाटे आनंद माझ्या मना हो ॥ गोसावीनंदन विसरे संसारयातना हो ॥ जय जय० ॥ ४ ॥