संत नामदेव महाराज रचित भक्तीरसपूर्ण आरती; भगवंताच्या कृपेचा राजमार्ग | Sadguru Aniruddha Bapu
Aniruddha Bapu All - He and His World (Marathi)
0:00 / 0:00
संत नामदेव महाराज रचित भक्तीरसपूर्ण आरती; भगवंताच्या कृपेचा राजमार्ग | Sadguru Aniruddha Bapu
10 201 просмотр · 22 ч назад
Aniruddha Bapu All - He and His World (Marathi)
362 тыс. подписчиков
10 201 просмотр · 22 ч назад
घालीन लोटांगण, वंदीन चरण ... गणेशोत्सव असो, नवरात्री उत्सव असो, सत्यनारायणाची पूजा असो की मंदिरातील नित्य आरती असो, सर्वत्र आरतीनंतर भक्तांकडून प्रेमाने महान संत श्री नामदेव महाराजांची भक्तिरसाने ओथंबलेली ही रचना गायली जाते.
गुरुवार दिनांक २९ ऑक्टोबर २०२६ रोजी, सद्गुरु अनिरुद्ध बापूंच्या पितृवचनाची सुरुवातच घालीन लोटांगण, वंदीन चरण... या अभंगगायनाने झाली.
या अभंगाचा भावार्थ, त्यात दिग्दर्शित केलेला क्रम, त्याद्वारे सगुण भक्तीचा दाखवला गेलेला महामार्ग यांबद्दल सांगून बापूंनी या अभंगाचे अनन्यसाधारण महत्त्वदेखील प्रतिपादित केले.
या अभंगाच्या आधारे भक्तिमार्गावर खूप मोठा पल्ला गाठलेल्या नारायण नावाच्या एका साध्याभोळ्या भक्ताची कथा बापूंनी ह्या पितृवचनात सांगितली.
एका गावात राहणारा नारायण नावाचा युवक, त्याच्या वडिलांनी त्याचे पाठशाळेत शिकण्यासाठी नाव घालूनही शाळेत गेलाच नव्हता. त्याच्या वडिलांना हे कळताच त्यांनी त्याला याबाबत विचारताच त्याने खरे सांगितले नाही. पाठशाळेच्या शिक्षकांना वडिलांनी बोलावले होते आणि ते समोर येताच नारायणला चुकीची कबुली द्यावीच लागली.
नारायणला शिक्षा म्हणून त्याच्या वडिलांनी गावामधील रामाच्या मंदिरातील खांबाला बांधून ठेवले. शिक्षकांकडून नारायण जोपर्यंत घालीन लोटांगण... हा अभंग तोंडपाठ करत नाही, तोपर्यंत त्याची सुटका होणार नव्हती.
मंदिरातील रामाकडे पाहता पाहता अत्यंत आर्ततेने नारायण हा अभंग आळवत होता आणि अभंगातील क्रमानुसार लोटांगण, वंदन करणे, दर्शन, रूपध्यान, आलिंगन, पूजन, ओवाळणे इत्यादि उपचार मनाने करत होता. हे करता करता त्याला भक्तिमार्गावर प्रगती करून जो अत्यंत सुंदर अनुभव प्राप्त झाला, त्याबद्दलदेखील बापूंनी कथेच्या शेवटी सांगितले.
संत नामदेव महाराजांच्या या अभंगाच्या मार्गदर्शनास अनुसरून प्रत्येक भक्त पारमार्थिक प्रगती करू शकतो असेदेखील बापू म्हणाले.
ह्या कथेच्या अनुषंगाने सद्गुरु बापूंनी श्रद्धावानांसह -
‘घालीन लोटांगण, वंदीन चरण,
डोळ्यांनी पाहीन रूप तुझें ॥
प्रेमें आलिंगिन, आनंदे पूजिन,
भावें ओवाळिन म्हणे नामा ॥ ’
हा अभंग म्हटला.
हा अभंग सगुण भक्तीचा मार्ग दिग्दर्शित करतो, हा शरणागतीचा मार्ग दिग्दर्शित करतो, असेही बापू म्हणाले.
त्याचबरोबर बापूंनी श्रद्धावानांकडून
'अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम। तस्मात् कारुण्य भावेन् रक्ष रक्ष परमेश्वर॥'
हा श्लोक म्हणून घेतला.
#GhalinLotangan #SantNamdevMaharaj #AniruddhaBapu
©℗
----------------------------------
Join the WhatsApp Channel - https://whatsapp.com/channel/0029Vb9c...
For more information about Sadguru Shree Aniruddha (Bapu) -
Aniruddha Devotion Sentience site - https://aniruddhabapu.in
Samirsinh Dattopadhye blog - https://sadguruaniruddhabapu.com
Know more about the Devotional Services carried out under the guidance of Sadguru Shree Aniruddha (Bapu) -
http://www.aniruddhasadm.com
https://aniruddhaseva-institute.com
----------------------------------