Manoj Jarange EXCLUSIVE : ऑडिओ क्लीपविषयीची 'ती' गोष्ट रामदास कदमांना कशी समजली? मनोज जरांगेंचा सवाल
ABP MAJHA
0:00 / 0:00
Manoj Jarange EXCLUSIVE : ऑडिओ क्लीपविषयीची 'ती' गोष्ट रामदास कदमांना कशी समजली? मनोज जरांगेंचा सवाल
151 002 просмотра · 14 часов назад
ABP MAJHA
16,5 млн подписчиков
151 002 просмотра · 14 часов назад
#abpमाझा #abpmajhalive #marathinews #maharashtrapolitics
Manoj Jarange Patil and Ramdas Kadam: मनोज जरांगे यांनी ऑडिओ क्लीपचा बॉम्ब टाकल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडाली आहे. यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने या ऑडिओ क्लीपच्या (Audio Clip) फॉरेन्सिक चौकशीची मागणी केली आहे. शिंदे सेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी जरांगे (Manoj Jarange Patil) यांच्या ऑडिओ क्लीपच्या टायमिंगवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. याबाबत मनोज जरांगे पाटील यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना रामदास कदम यांच्याविषयी नवा सवाल उपस्थित केला आहे. मी काल सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेतली. मात्र, त्यापूर्वीच रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी एका वृत्तवाहिनीला मी दाखवलेली ऑडिओ क्लीप कोणत्या तारखेची आहे, हे कसे सांगितले? त्यांना ही माहिती अगोदरच कशी मिळाली? माझं एकनाथ शिंदे (Eknath Shinde) साहेबांना सांगणं आहे की, जवळचे लोक धोकादायक असतात. माझ्यासोबतचे अनेक लोक फोडण्यात आले. त्यावरुन मी हे सांगत आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले. (Maharashtra Politics)
यात एकनाथ शिंदे साहेबांच्या पोराचं नाव आलं. त्यांनी भाजपला विचारलं पाहिजे, माझ्या पोरांचं नाव कसं आलं? भाजपने पैसे दिले असतील तर एकनाथ शिंदेंना सांगितलं पाहिजे की, आम्ही तुम्हाला पैसे दिले आहेत. शिंदे आणि फडणवीस साहेबांनी या प्रकरणाच्या खोलात गेले पाहिजे. हे खूप मोठा कट आहे, षडयंत्र आहे. याचा शिंदे, फडणवीस, शरद पवार, राज ठाकरे अशा सगळ्याच पक्षांना धोका आहे, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
ही ऑडिओ क्लीप मला कोणी दिली, त्याचा सोर्स मी सांगणार नाही. त्यासाठी सरकारने जबाबदारी घ्यायला लागते, तर लोक समोर येतात. सरकारने आपल्या पक्षाच्या नेत्यांना वाचवण्याचे काम करु नये. ही गोष्ट बाहेर आली हा महत्त्वाचा विषय आहे. एआय तंत्रज्ञानाने क्लीप बनवायला त्यामधील लोक आमच्या ओळखीचे पाहिजेत, आम्हाला त्यांचे आवाज माहिती असायला हवेत. एआयने ऑडिओ क्लीप बनवायची असती तर एक-दोन जणांच्या आवाजाबाबत तसं करता येतील. पण या ऑडिओ क्लीपमध्ये इतकेजण आहेत. इतक्या लोकांचं एआय कसं होऊ शकतं? ही चर्चा ओरिजिनल आहे. तुम्ही अशाप्रकारे लोकांना उद्ध्वस्त करणार असेल तर ते भीषण आहे. मराठ्यांची पोरं फोडा, समन्वयक फोडा, काय आहे ही परिस्थिती, असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केला.
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub that provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe YouTube channel : https://bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: https://marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: https://itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: https://play.google.com/store/apps/de...
एबीपी माझा LIVE | महाराष्ट्रातील बातम्या | मराठी बातम्या | ABP Majha LIVE TV | ABP Majha Marathi news | ABP Majha news LIVE | News Today Live | Breaking news LIVE | Maharashtra Politics | Vidhan Parishad Election | Devendra Fadnavis | Eknath Shinde | Sunetra Pawar | Mumbai Rains update | Maharashtra Weather | Monsoon | Missing Link | Mumbai Rain | Pune Rain | Maharashtra Rain |