Перейти к содержимому

नारात्रात घटस्थापना पुजाविधी.घरच्यांघरी शास्त्रोक्त पद्धतिने घटस्थापना करा. मंत्र स्तोत्रसह माहिती

Savita Salve

0:00 / 0:00

नारात्रात घटस्थापना पुजाविधी.घरच्यांघरी शास्त्रोक्त पद्धतिने घटस्थापना करा. मंत्र स्तोत्रसह माहिती

666 просмотров · 12 дней назад
Savita Salve
16,6 тыс. подписчиков
666 просмотров · 12 дней назад
नारात्रात घटस्थापना पुजाविधी.घरच्यांघरी शास्त्रोक्त पद्धतिने घटस्थापना करा. मंत्र स्तोत्रसह माहिती 🍁||श्री स्वामी समर्थ ||🍁 🍁‼️शारदीय नवरात्र/ घटस्थापना‼️🍁 (आश्विन शु.१ प्रतिपदा ते अश्विन शु.९ नवमी) (दि.११ ऑक्टोंबर ते २० ऑक्टोंबर २०२६) 🙏‼️शारदीय नवरात्र घट स्थापना विधी‼️🙏 👉साहित्य : देवघरातील कुलदेवीचा टाक, वेळूची टोपली,माती, मातीचा घट,कोरे लाल वस्त्र,विड्याची अकरा पाने,माळ लावण्यासाठी-मंडपी, पाट/चौरंग, अखंड दीप, हळदी, कुंकू, धूप, दिप, खडीसाखर,दुर्वा, फुले , सुपारी, पाणी,ताम्हण, पळी,नित्यसेवा ग्रंथ,आसन 🍁🙏श्री स्वामी स्तवन व श्री स्वामी समर्थ जप -एक माळ करावा 👉मंगलतिलक : ॐ सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके,शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते l' 🍁हा मंत्र म्हणत पुरुषांनी अष्टगंध व महिलांनी हळदी कुंकू स्वतःच्या कपाळी लावावे. 🍁आचमन : खालील मंत्र चार वेळा तळहातावर पाणी घेवून प्यावे.* 🍁1.*ॐ ऐं आत्मतत्वं शोधायामी नमः स्वाहा l* 🍁2.ॐ ह्रिं विद्यातत्वं शोधायामी नमः स्वाहा l 🍁3.*ॐ क्ली शिवतत्वं शोधायामी नमः स्वाहा l* 🍁4.*ॐ ऐं ह्रीम ,क्लीम सर्वतत्वं शोधायामी नमः स्वाहा l* 🙏प्राणायाम : गायत्री मंत्र म्हणत प्राणायाम करावा 🙏संकल्प :- उजव्या हातात २ पळी पाणी घेऊन त्यात अक्षता फुल टाकून खालील संकल्प म्हणावा व नंतर पाणी सरळ समोरील ताम्हणात सोडावे.* 🙏संकल्प :मी (अमुक) गोत्रात उत्पन्न ( अमुक) नावाचा/ नावाची माझ्या सर्व कुटुंबाला क्षेम, स्थैर्य, आयु, आरोग्य ,विद्या ,ऐश्वर्य प्राप्तीसाठी ,वर्धनासाठी ,सर्व दुरीत उपशमनासाठी ,अशुभ शक्तिंचे भय उपद्रव निवारण्यासाठी ,आर्थिक सबलीकरणासाठी , अदित्यादी सकल ग्रह पिडा शांती साठी त्रिविध ताप निरसनासाठी तसेच श्री कुलदेवी व श्री कुलदैवत व श्री सद्गुरू ची अखंड अचंचल अभेद्य भक्ती ,सेवा व संन्नीध्य प्राप्तीसाठी प्रतिवर्षी कुलाचाराच्या अंगभूत श्री घटस्थापना ,अखंड दीप प्रज्वलन आणि श्री दुर्गा सप्तशती (संस्कृत /प्राकृत) ग्रंथाचे ( अमुक ) संख्येत पाठाचा संकल्प करीत आहे . 🙏श्री गणपती अथर्वशीर्ष एक वेळा पठण करावे. 🙏अखंड नवार्णव मंत्राचा जप करीत पुढील कृती करावी. 🍁1. घट स्थापनेच्या जागेवर रांगोळी काढून एक पाट किंवा चौरंग ठेवावा . त्यावर लाल वस्त्र अंथरावे. चौरंगाच्या डाव्या बाजूस अखंड दीप प्रज्वलित करून त्याची पूजा करावी. 🍁2. एक वेळूची टोपली त्या पाट किंवा चौरंगावर ठेवून टोपलीत आपल्या शेतातील अथवा पवित्र जागेची मती ,गहू मिसळून भरावी. 🍁3.त्यावर स्वच्छ धुतलेला मातीचा घट लाल लोकरीचे नऊ वेढे देऊन ठेवावा. त्यात पाणी, दुर्वा, सुपारी, पैसा, गंध,अक्षता टाकाव्यात. विड्याची नऊ पाने व आंब्याचा डहाळा लावावा. 🍁4.घटाच्या चारही दिशेला पूर्वेकडून उतरते गंध लावावे. घटावर एका तांब्याच्या ताटलीत अथवा स्टीलच्या ताटलीत तांदूळ भरून ठेवावे. 🍁5. खालील प्रमाणे कुलदेवी ची पूजा करावी ॐ सर्व स्वरूपे सर्वेशे सर्व शक्ती समन्विते l भयेभ्यस्त्राही नो देवी दुर्गे देवी नमोsस्तुते l l 🍁म्हणून टाकास🙏 नमस्कार करावा . 🍁देवीच्या टाकावर 16/1 वेळा श्री सुक्त म्हणून अभिषेक करावा. 🌿घटावर विड्याची दोन पाने पूर्वेकडे देठ करून ठेवावी ,त्यावर देवीचा टाक झोपून ठेवावा. 👉टाकाची पंचोपचारे पूजा करावी 🍁🔸ध्यान- नमो दैव्यै , महादैव्यै शिवायै सततं नमः॥ नमः प्रकृत्यै , भद्रायै , नियता: प्रणता: स्मताम॥ 🙏श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गा देव्यै नमः 🙏॥ध्यायम ध्यायामि नमस्काराणी समर्पयामि ॥ (घटावरील जगनमातेच्या (टाकास नमस्कार करावा) 🍁घटावरील जगनमातेच्या टाकाची खालीलप्रमाणे पंचोपचार पूजा करावी 🙏 🌸1.श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गा देव्यै नमः ॥ ▫️विलेपनार्थे चंदनं समर्पयामि॥ ▫️अलंकारार्थे अक्षताम समर्पयामि ॥ ▫️हरिद्रा कुंकुम सकल सौभाग्यद्रव्याणी समर्पयामि ॥ (घटावरील जगनमातेच्या टाकास गंध लावावे ,अक्षता वहाव्यात, व हळद कुंकू वहावे) 🌸2.श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गा देव्यै नमः॥ 🪷ऋतूकालोद्भव पुष्पम समर्पयामि॥ (घटावरील जगनमातेच्या टाकास फुले वाहवित) 🌸3.श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गा देव्यै नमः॥ धूपं आघ्रापयामी॥ 🙏(घटावरील जगनमातेच्या टाकास धूप ओवाळणे) 🌸4.श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गा देव्यै नम: 🪔 दीपं दर्शयामी॥ (घटावरील जगनमातेच्या टाकास दीप ओवळणे) 🙏नैवेद्यसाठी खाली भरीव मंडल करून त्यावर नैवेद्य ठेवावे त्यावर एक तुळसपत्र ठेवून नैवेद्य दाखवावे. 🌸5.श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गा देव्यै नमः॥🙏 🍚नैव्येद्यं समर्पयामि॥🙏 (घटावरील जगनमातेच्या टाकासकोणत्याही गोड पदार्थाचा नैवद्य दाखवावा) 🙏🌿पूजे नंतर 1 माळ घटावर खालील मंत्राने बांधावी. 🙏ॐ मां माले महामाये सर्व शक्ती स्वरूपिणी ॥ चतुर्वर्ग त्वयि न्यस्तं स्तन्माने सिध्दीदा भव ॥ 🙏पहिल्या दिवशी..*🌿विड्याच्या पानाची माळ बांधावी* आरती करावी. 🙏रोज घटावरील भगवतीची दुरूनच पंचोपचार पूजा करावी घटास माळ चढवावी. व आरती करावी. *🙏नऊ दिवसात सर्व कुटुंबीयांनी मिळून 14 किंवा 28 पाठ दुर्गा सप्तशती संस्कृत/प्राकृत ग्रंथाचे वाचन करावे. ꧁𒆜||श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली ||𒆜꧂ #savita #savitasalve #स्वामींसेवा #shree swamisamarth