एसआयआर विरोधकांच्या टोळीयुद्धात न्यायाधीशांची उडी... | Dinesh Kanji | Gyanesh Kumar | SIR |
News Danka
0:00 / 0:00
एसआयआर विरोधकांच्या टोळीयुद्धात न्यायाधीशांची उडी... | Dinesh Kanji | Gyanesh Kumar | SIR |
27 530 просмотров · 19 ч назад
News Danka
336 тыс. подписчиков
27 530 просмотров · 19 ч назад
#dineshkanji #GyaneshKumar #SIR #SpecialIntensiveRevision
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि आयोगाच्या स्पेशल इंटेन्सिव्ह रिविजन (SIR) या उपक्रमाचे निमित्त करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधणाऱ्या विरोधकांमध्ये जोरदार टोळीयुद्ध सुरू असल्याचे चित्र आहे. एसआयआर मोडीत काढण्यासाठी सगळे एकत्र आलेले आहेत. हे निमित्त करून त्यांना मोदी सरकार उलथवायचे आहे. त्यासाठी रस्त्यावर यायचे आणि अराजक निर्माण करायचे, याबाबत सगळ्यांचे एकमत आहे. परंतु तरीही आपसांत धुमश्चक्री सुरू आहे. अनेकदा हे तंटे चव्हाट्यावर येताना दिसतात. श्रेय कोणी घ्यायचे, नेतृत्व कोणी करायचे आणि चेहरा कोण बनणार, हे मतभेदाचे मुद्दे बनले आहेत. या राड्यात न्यायाधीशांनीही उडी घेतली आहे. सगळीकडेच उभी फूट दिसते आहे. राजकारणातील मोदी विरोधकांमध्ये एकवाक्यता नाही; इंडिया आघाडीतील गटतट तर अनेकदा दिसत असतात. तेच चित्र आता मोदी सरकारला दाबण्यासाठी तयार करण्यात आलेल्या तथाकथित 'प्रेशर ग्रुप' आणि काँग्रेस पक्षात दिसू लागले आहे. मोदींच्या विरोधकांमध्ये सुरू असलेला हा तंटा खूप खालपर्यंत झिरपला आहे. मुलाखतकार व पत्रकार राजू परुळेकर हे कॉक्रोच जनता पार्टीच्या विरोधात सोशल मीडियावरून सातत्याने आवाज उठवताना दिसतात. राजू परुळेकर यांच्या विरोधामुळे अभिजित दीपके हे अरविंद केजरीवाल यांचेच पिल्लू आहे, यावर शिक्कामोर्तब होत आहे. कारण अण्णा आंदोलनाच्या काळात अण्णा हजारे यांचा आवाज बनलेले परुळेकर यांना केजरीवाल यांच्या षडयंत्रामुळे बाहेर पडावे लागले होते. त्यानंतर बराच काळ केजरीवाल आणि परुळेकर यांच्यात धुमश्चक्री सुरू होती. राजू परुळेकर हे घनघोर मोदी विरोधक आहेत. मोदींच्या विरोधात ते सतत व्यक्त होत असतात; आता ते मोदींचा विरोध करण्यासाठी आंदोलने करणाऱ्या सीजेपीला सातत्याने लक्ष्य करत आहेत. "सीजेपी इज नॉट जेन झी", ही परुळेकरांची पोस्ट आहे. त्यामुळे दीपके हा 'आप'च्याच कॅम्पचा माणूस आहे, हे बऱ्यापैकी उघड होत आहे.
There appears to be a fierce turf war among the opponents who are targeting Prime Minister Narendra Modi, using Chief Election Commissioner Gyanesh Kumar and the Election Commission’s Special Intensive Revision (SIR) initiative as a pretext. Everyone has come together to derail the SIR. They want to use this issue to bring down the Modi government. There seems to be a consensus among them that they should take to the streets and create chaos. Yet, despite this, intense infighting continues among them. Their disputes often come out into the open. Who will take the credit, who will lead, and who will become the face of the movement have emerged as major points of disagreement. Judges have also entered this battle. There appears to be a split everywhere.
There is no unity among Modi’s political opponents; the factionalism within the INDIA alliance has often been visible. The same picture is now emerging within the so-called “pressure group” created to put pressure on the Modi government, as well as within the Congress party.
The infighting among Modi’s opponents has penetrated very deeply. Interviewer and journalist Raju Parulekar has been consistently raising his voice on social media against the Cockroach Janata Party (CJP). Parulekar’s opposition is increasingly reinforcing the perception that Abhijit Dipke is a person from Arvind Kejriwal’s camp. During the Anna movement, when Parulekar had emerged as a voice for Anna Hazare, he was forced to distance himself from the movement because of what he described as Kejriwal’s conspiracy. For quite some time afterward, a bitter confrontation continued between Kejriwal and Parulekar.
Raju Parulekar is a staunch opponent of Modi and has repeatedly expressed his opposition to the Prime Minister. Now, however, he is consistently targeting the CJP, which is organising protests against Modi. “CJP is not Gen Z,” reads one of Parulekar’s social media posts. This makes it fairly clear that Dipke belongs to the Aam Aadmi Party’s camp.
#ElectionCommission #NarendraModi #ModiGovernment #RahulGandhi #Congress #INDIAAlliance #ArvindKejriwal #AAP #AbhijitDipke #RajuParulekar #CJP #Politics #IndianPolitics #PoliticalWar #Opposition #ElectionCommissionIndia #SIRControversy #MaharashtraPolitics #NewsDanka
Follow us on X (Twitter ) at:
https://X.com/NewsDanka
Follow us on Facebook at:
/ newsdanka
Follow us on Instagram at:
https://instagram.com/news.danka?igsh...
Visit our Website for more content at:
https://www.newsdanka.com/
Visit us at :
https://g.co/kgs/k7LjksU