खमंग आणि मऊ पुरणपोळीपारंपरिक कोकणी पद्धतीची नारळाची पुरणपोळी😋#ओल्यानारळाचीपुरणपोळी #नारळाचीपुरणपोळी
पूर्णान्न by Mukta
0:00 / 0:00
खमंग आणि मऊ पुरणपोळीपारंपरिक कोकणी पद्धतीची नारळाची पुरणपोळी😋#ओल्यानारळाचीपुरणपोळी #नारळाचीपुरणपोळी
180 просмотров · 5 дней назад
पूर्णान्न by Mukta
400 подписчиков
180 просмотров · 5 дней назад
ओल्या नारळाची खमंग, मऊ आणि चविष्ट पुरणपोळी 🥥😋 पारंपरिक कोकणी पद्धतीने बनवलेली ही गोड पुरणपोळी नक्की करून पाहा. घरच्यांना आणि पाहुण्यांना नक्कीच आवडेल! ❤️
व्हिडिओ आवडला तर Like 👍 Share 📲 आणि Subscribe ❤️ करायला विसरू नका.
#ओल्यानारळाचीपुरणपोळी #नारळाचीपुरणपोळी #पुरणपोळी #मराठीरेसिपी #कोकणीरेसिपी #महाराष्ट्रीयनरेसिपी #PuranannByMukta
🥥 साहित्य
पुरणासाठी:
2 वाट्या ओला नारळ
1 वाटी गूळ
1 वाटी besan
½ टीस्पून वेलची पूड
¼ टीस्पून जायफळ पूड
1 टीस्पून तूप
कणकेसाठी:
1वाटी गव्हाचे पीठ
1 वाटी मैदा
1/2 चमचा हळद
चिमूटभर मीठ
2 टेबलस्पून तेल
पाणी आवश्यकतेनुसार
पोळी लाटण्यासाठी थोडे तांदळाचे पीठ/गव्हाचे पीठ
भाजण्यासाठी तूप
👩🍳 कृती
1. कढईत ओला नारळ, बेसन आणि गूळ घेऊन मध्यम आचेवर शिजवा.
2. गूळ वितळून मिश्रण घट्ट होईपर्यंत सतत ढवळत राहा.
3. त्यात वेलची पूड, जायफळ पूड आणि तूप घालून मिक्स करा.
4. मिश्रण घट्ट झाले की गॅस बंद करून पूर्ण थंड होऊ द्या.
5. कणकेसाठी गव्हाचे पीठ, मैदा,मीठ, हळद आणि तेल घेऊन मऊसर कणीक भिजवा. 15–20 मिनिटे झाकून ठेवा.
6. कणकेचा गोळा घेऊन त्यात नारळाचे पुरण भरावे आणि हलक्या हाताने पोळी लाटावी.
7. गरम तव्यावर दोन्ही बाजूंनी छान भाजून घ्या.
8. वरून तूप लावून गरमागरम ओल्या नारळाची पुरणपोळी सर्व्ह करा. 😋🥥
टीप: पुरण खूप सैल ठेवू नका; घट्ट असेल तर पोळी लाटताना फुटणार नाही.