गुहेतील स्वयंभू शिवमंदिर व सापांचे दर्शन! | मार्लेश्वर महादेव मंदिर रत्नागिरी | Marleshwar Ratnagiri
Tirthaa Vaibhav
0:00 / 0:00
गुहेतील स्वयंभू शिवमंदिर व सापांचे दर्शन! | मार्लेश्वर महादेव मंदिर रत्नागिरी | Marleshwar Ratnagiri
846 просмотров · 2 года назад
Tirthaa Vaibhav
2,6 тыс. подписчиков
846 просмотров · 2 года назад
मार्लेश्वर महादेव मंदिर || Snake in Marelshwar Temple Ratnagiri || मार्लेश्वरमध्ये सापाचे दर्शन
मार्लेश्वर महादेव मंदिर || Marelshwar Ratnagiri || मार्लेश्वरमध्ये सापाचे दर्शन @Tirthvaibhav
श्री क्षेत्र मार्लेश्वर हे रत्नागिरी जिल्ह्यातील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. संगमेश्वर तालुक्यातील मारळ गावाजवळ निसर्गाच्या कुशीत हे स्थान वसलेलं आहे. तिकडे जाणारा रस्ता आहे. तितकाच निसर्ग संपन्न आणि कोकणी ग्रामीण कृषी जीवनाचे दर्शन घडविणारा आहे. कोल्हापूरहून आम्ही अंबाघाट कळकदरा खडी कोळवन मार्गे श्री मार्लेश्वरच्या दर्शनाला पोहोचलो. रत्नागिरी किंवा मुंबईतून येताना देवरुख हा ती व मार्गे मार्लेश्वरला पोहोचता येते. डोंगराच्या पायथ्यापर्यंत वाहन जाते, येथील वाहनतळावर चार चाकी साठी 30 रुपये तर दुचाकींसाठी दहा रुपये आकारले जातात. पार्किंग परिसरात पूजा साहित्य व खाद्यपदार्थांचे अनेक स्टॉल्स आहेत. साधारण पाचशे पायऱ्या चढून आपण मंदिरात पोहोचतो. या पायऱ्यांवरून वर जात असताना ही अनेक स्टॉल्स आपल्या नजरेस पडतात. या स्टॉल्सधारकांनी दमणूक झालेल्या भाविकांना काही काळ विश्रांती घेण्याची ही सोय केलेली आहे. तसेच या ठिकाणी मिळणारी अस्सल कोकणी सरबते आणि गोड आमसूल याची चव आपण चाखू शकता. मंदिराचा गाभारा निसर्गनिर्मित गुहा आहे, त्याला साडेतीन फुटी प्रवेशद्वार आहे. या प्रवेशद्वाराशेजारीच एक छोटसं मंदिर आहे. तेथील श्री गणरायांचे दर्शन घेतल्यानंतरच गाभाऱ्यातील मार्लेश्वराच्या दर्शनासाठी जातात. त्याचबरोबर या छोटेखानी मंदिराशेजारीच पाण्याचे एक पवित्र कुंड आहे.
गुहेत प्रवेश केल्यानंतर एक मार्लेश्वराचे आणि दुसरे श्री मल्लिकार्जुन यांचे अशी दोन शिवलिंगे आहेत. मल्लिकार्जुन आणि मार्लेश्वर हे दोघे भाऊ असून मल्लिकार्जुन हा मोठा भाऊ असल्याचे मानले जाते. मंदिराच्या गाभाऱ्यात व्हिडिओ शूटिंगला परवानगी नाही, मात्र आपण प्रत्यक्ष जाऊन ती ईश्वरी अनुभूती घेऊ शकता. काळोख्या गुहेत समई आणि निरंजनाच्या मंदप्रकाशात मार्लेश्वराचे शिवलिंग उजळून निघालेले असते. तेथे इतर कोणताही दिवा लावण्यास मनाई आहे. या गुहेच्या कपारींमध्ये अनेक भाविकांना सापांचे दर्शन झाले आहे. मात्र त्यांचा कोणताही उपद्रव भाविकांना झाल्याचे ऐकीवात नाही.
श्री मार्लेश्वराचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची वर्षभर रिघ लागलेली असते. सोमवार श्रावण महिना महाशिवरात्र दत्त जयंती या दिवशी भक्तांचा महासागर लोटतो. मकर संक्रांति दिवशी भरणारी यात्रा हा या देवस्थानचा प्रमुख उत्सव होय. या दिवशी देवाचा लग्न सोहळा मोठ्या थाटात पार पडतो. श्री मारलेश्वर हा वर तर गिरिजाई ही वधू असते. कोंडगाव साखरपा येथून भोगीच्या दिवशी श्री गिरीजाई देवीची पालखी मार्लेश्वरला येते तर संक्राती दिवशी असंख्य भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा.
या ठिकाणचे आणखी एक आकर्षण म्हणजे येथील महाकाय धबधबा. तब्बल दोनशे फुटांवरून कोसळणारा हा धबधबा धारेश्वर धबधबा म्हणून ओळखला जातो. सह्याद्रीच्या कड्यावरून कोसळणारा हा धबधबा पुढे बाव नदी म्हणून वाहू लागतो. पावसाळ्यात आजूबाजूला अनेक छोटी धबधबे कोसळत असतात, हे दृश्य अतिशय मनोहारी आणि डोळ्याचे पारणे फेडणारे असते. या परिसरात वानरांची ही मोठी संख्या आहे त्यांच्या अनेक करामती आपल्याला अनुभवास मिळतात. भाविकांच्या हातातील खाद्यपदार्थ पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या हिसकावून घेत ते पळ काढतात. माझ्या हातातील हिसकावून घेतलेली ही पाण्याची बाटली घेऊन हे महाशय अगदी ऐटीत जाताना आपल्याला दिसत आहेत. निसर्गरम्य परिसर, कोसळणारा तो जलप्रपात, गुढ अशी शांतता आणि श्री मार्लेश्वराची ती दिव्य अनुभूती यामुळे मन बराच काळ या परिसरात रेंगाळत राहते.
Marleshwar is a Shiv temple in Sangameshwar subdivision of Ratnagiri district in the Indian state of Maharashtra. It takes about one and a half hours to reach by road; visitors then climb 300–400 steps, which are lined with refreshment stalls to keep the climbing pilgrims refreshed. The temple is in a cave and has a small viewing platform from which the magnificent Dhareshwar Waterfalls can be admired. Every year thousands of devotees visit and perform ablutions in the nearby Bav River.
📌 व्हिडिओमधील महत्त्वाचे मुद्दे (Key Highlights):
🚩 सह्याद्रीच्या कुशीतील निसर्गनिर्मित गुहेतील श्री मार्लेश्वर व श्री मल्लिकार्जुन शिवलिंग दर्शन
🐍 गुहेतील नागराजांचे (सापांचे) पावन व अहिंसक दर्शन
🌊 तब्बल २०० फुटांवरून कोसळणारा मनमोहक 'धारेश्वर धबधबा' व बाव नदीचा उगम
💒 मकर संक्रांतीला होणारा श्री मार्लेश्वर आणि श्री गिरिजाई देवीचा पारंपरिक विवाह सोहळा
🪜 ५०० पायऱ्यांचा मार्ग आणि कोकणी सरबत, गोड आमसूलाची चव
🐒 निसर्गरम्य परिसर आणि स्थानिक वानरांची धमाल
🗺️ येथे कसे पोहचावे? (How to Reach Marleshwar):
स्थान: मारळ गाव, तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी, महाराष्ट्र.
मार्ग: कोल्हापूरहून अंबाघाट - खडी कोळवन मार्गे किंवा मुंबई/रत्नागिरीहून देवरुख - मारळ मार्गे थेट मंदिराच्या पायथ्यापर्यंत पोहोचता येते.
वाहतूक व पार्किंग: डोंगराच्या पायथ्याशी दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी पार्किंगची उत्तम सोय आहे.
👍 व्हिडिओ आवडल्यास Like, Share आणि Subscribe करायला विसरू नका!
#Marleshwar #RatnagiriTourism #MarleshwarTemple #DhareshwarWaterfall #KokanTourism #Ratnagiri #ShivMandir #KokanDiaries #SnakeInTemple #TirthVaibhav
#Marleshwar
#RatnagiriTourism
#Kokan
#DhareshwarWaterfall
#MahadevTemple
#TirthVaibhav
#hindutemple
#ratnagiri
#marleshwar
#kokan