Thane | Aditya Thackeray येताच ठाण्यात गर्दी; म्हस्केंच्या आव्हानानंतर Raut, Avinash Jadhav मैदानात
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
0:00 / 0:00
Thane | Aditya Thackeray येताच ठाण्यात गर्दी; म्हस्केंच्या आव्हानानंतर Raut, Avinash Jadhav मैदानात
236 206 просмотров · 1 дн. назад
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
2,47 млн подписчиков
236 206 просмотров · 1 дн. назад
#adityathackeray #avinashjadhav #eknathshinde #thane #pradeeppurnekar
"ठाण्यात येऊन एकनाथ शिंदेंवर आरोप कराल, तर ठाण्यातून परत जाऊ शकणार नाही", असं खुलं आव्हान खासदार नरेश म्हस्के यांनी ठाकरेसेनेला दिलं आणि यानंतर ठाण्यात हायव्हॉल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. प्रदीप पूर्णेकर प्रकरणामुळे ठाण्यातील वातावरण आधीच तापलं आहे. त्यात आमदार आदित्य ठाकरे हे ठाण्यात येण्यापूर्वी म्हस्केंनी केलेल्या विधानाने प्रकरण अधिकच तापलं. पण यामुळे संतप्त झालेल्या ठाकरेसेनेसोबतच राज ठाकरेंच्या मनसेने देखील एन्ट्री घेतली. आदित्य ठाकरे येणार आणि सुखरूप परतही जाणार, असं म्हणत मनसे नेते अविनाश जाधव यांनीही म्हस्केंच्या चॅलेंजनंतर आदित्य ठाकरेंच्या ठाणे दौऱ्याची जबाबदारी घेतली. तर आदित्य ठाकरे ठाण्यात येताच शिवसैनिकांची प्रचंड मोठी गर्दी जमली. पूर्णेकर कुटुंबीयांना न्याय देण्याच्या या लढाईत खासदार संजय राऊत, आमदार अनिल परब, राजन विचारे आणि अनेक कार्यकर्तेही मैदानात उतरले.