Перейти к содержимому

SHORT NEWS 20 | दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?

Yes News Marathi

0:00 / 0:00

SHORT NEWS 20 | दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?

4 098 просмотров · 3 нед. назад
Yes News Marathi
484 тыс. подписчиков
4 098 просмотров · 3 нед. назад
#उत्तर_सोलापूर #अपर_तहसील_कार्यालय #वडाळा #मार्डी #सोलापूर #सोलापूर_जिल्हा #सुभाष_देशमुख #राजू_खरे #जयकुमार_गोरे #सचिन_कल्याणशेट्टी #शहाजी_पवार #इंद्रजीत_पवार #एस_कार्तिकेयन #महसूल_विभाग #महाराष्ट्र_राजकारण #राजकीय_संघर्ष #विधानपरिषद_आचारसंहिता #Solapur #NorthSolapur #Wadala #Mardi #SubhashDeshmukh #RajuKhare #JaykumarGore #SachinKalyanshetti #ShahajiPawar #IndrajitPawar #SolapurNews #YesNewsMarathi #YesNewsMarathiLive Subscribe Channel :- https://bit.ly/3mEVBUT उत्तर सोलापूर तालुक्यातील अपर तहसील कार्यालय वडाळा या ठिकाणी करावे की मार्डी या ठिकाणी करावे..याबाबतचा निर्णय शासन पातळीवर प्रलंबित आहे. वडाळा येथे मंजूर झालेल्या अपर तहसील कार्यालयाच्या विरोधात 5000 हरकती घेण्यात आल्या. याचा सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाने सविस्तर अहवाल शासनाकडे पाठविला आहे. हे अपर कार्यालय म्हणजे भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांच्या प्रतिष्ठेचा आणि त्यांचे पूर्वाश्रमीचे विश्वासू आणि आता राजकीय विरोधक असलेल्या शहाजी पवार तसेच झेडपीचे विद्यमान उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांच्या ताकतीचा विषय बनला आहे. अपर तहसील कार्यालय हे मार्डी या शहाजी पवार यांच्याच गावात राहिले पाहिजे असा आग्रह पालकमंत्री जयकुमार गोरे तसेच आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचा आहे. तर हे अपर तहसील कार्यालय वडाळा या ठिकाणीच करावे यासाठी आमदार सुभाष देशमुख तसेच मोहोळचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार राजू खरे यांनी जोर लावला आहे. महसूल खात्याचे प्रधान सचिव विकास खारगे यांच्याकडे हा विषय प्रलंबित आहे. जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांना दोन्ही गावचा सविस्तर अहवाल पाठवण्यात आला आहे. त्यामुळे आता मार्डी या ठिकाणीच अप्पर तहसील कार्यालय मंजूर करून घेऊन पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, झेडपीचे उपाध्यक्ष इंद्रजीत पवार, त्यांचे बंधू शहाजी पवार हे जिल्ह्यात आमचेच चालते हे दाखविण्याच्या तयारीत आहे. दुसरीकडे आमदार सुभाष देशमुख, आणि आमदार राजू खरे यांना काहीही करून हे अप्पर तहसील कार्यालय पवार यांचे गाव असलेल्या मार्डी मध्ये नको आहे. त्यामुळे या राजकीय लढाईमध्ये पालकमंत्री जयाभाऊ आणि आ.सचिन दादा जिंकणार की आमदार सुभाष बापू -आमदार खरे... या प्रश्नाचे उत्तर विधान परिषदेची आचारसंहिता संपल्यानंतर दिसणार आहे. गेल्या वर्षी मोहोळ तालुक्यातील अनगर अप्पर तहसील कार्यालय ज्याप्रमाणे गाजले त्याचप्रमाणे यावर्षी उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा येथे मंजूर झालेले अपर तहसील कार्यालय गाजत आहे. अखेर वर्षभरापासून रस्त्याच्या कडेला केबल टाकण्यासाठी खोदलेला रस्ता सोलापूर महापालिकेने बुजवण्यास केली सुरुवात... जुना पुना नाका ते क्रोमा सेंटर पर्यंत साईड पट्टी केली दुरुस्त विभागीय आयुक्त शीतल तेली उगले उद्या जिल्हाधिकारी कार्यालयात.. मतदार पुनर्नरीक्षण कार्यक्रमासंदर्भात घेणार अधिकाऱ्यांची बैठक तसेच मोहोळ तालुक्यातील मतदान केंद्राला देणार भेट ऊसाला प्रति टन पाच हजार रुपये भाव द्यावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केले सोलापूर पुणे महामार्गावर भीमानगर या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूर परिवहन विभागाची आढावा बैठक संपन्न...आलेल्या २० ई बसेस दिवाळीपर्यंत रस्त्यावर धावणार सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी विधान परिषद शिक्षक आणि पदवीधर निवडणुकी संदर्भात हॉटेल बालाजी सरोवर मध्ये घेतली कार्यकर्त्यांची बैठक ★Follow us, Share, Support★ Website:- http://yesnewsmarathi.com Facebook:-   / yesnewsmarathi   DailyHunt News:- https://m.dailyhunt.in/profile/yesnew... Twitter:-   / yesnewsmarathi   Shivaji Survase 9881748329 ★Contact us★ Mobile- 9881748329 Email:- yesnewsmarathi@gmail.com ★★★Watch our channel's popular playlists★★★ Advt    • नववर्षाची सुरुवात करा वेदना मुक्तीने | राऊ...   येस न्यूज मराठी युट्युब चॅनेल मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आम्ही १९ फेब्रुवारी २०१८ या शिवजयंतीच्या दिवशी पत्रकारितेच्या नव्या पर्वाला सुरूवात केलीय. मराठी भाषेला प्राधान्य देत संपूर्ण महाराष्ट्राच्या, देशाच्या तसेच जगाच्या बातम्या आम्ही आपणास या युट्युब चॅनेल द्वारे देत आहोत.